निसर्ग सौंदर्य सोनेश्वर कविता १४
सोनेश्वरी खळाळती कृष्णामाई
गाव -शिवाराची जीवनदायी
खडकाळ मार्गावरी धारा धावती
फेसाळत्या जलधारा धवल दिसती ||
जलधारा पूजते कातळाचे पाद्य
प्रवाहित धारांचे नादमयी वाद्य
प्रवाहित धारांचे नादमयी वाद्य
ऐकूनी कानांना गाणं भासे
प्रवाह वाजवती ढोल ताशे||
झाडं वेली गवतांकूर
ऐलतीरी पैलतीरी
कंंजाळुची झाडं शोभेे
कंंजाळुची झाडं शोभेे
गर्द हिरवीगार भारी
आठवणीच्या स्थळाला
पाऊल माझे वळले
कृष्णामाईचे पात्र पहायला
मन माझे अधिर झाले||
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
छायाचित्र श्री सोनेश्वर तीर्थक्षेत्र ओझर्डे येथील कृष्णामाई
आमच्या गावचे वैभव
ReplyDelete