माझी भटकंती माथेरान भाग क्र-७५






🥀☘️🌳🥀☘️🌳🥀☘️🌳
           माझी भटकंती
        🔅क्रमशः भाग-७५
          🍁माथेरान🍁
दिनांक २१  जानेवारी २०१६
 💫💫💫💫💫💫💫💫


   पहाटे पहाटे  वानरांच्या पत्र्यावरील उड्यामुळे जाग आली.. आवराआवर करून सकाळच्या वेळेतच माथेरान भटकंतीला निघालो.. "माथेरान " सह्याद्रीच्या डोंगररांगेपेक्षा वेगळी डोंगररांग रायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण.प्रेक्षणिय  पर्यटन स्थळ
समुद्रसपाटीपासून २६००फूट उंचावरील गिरीस्थान.डोंगरमाथ्यावरील पठारी भाग विपुल वृक्षांनी सजलेला आहे.सगळीकडे घनदाट झाडी हिरवागार गालिचा, आल्हाददायक व आरोग्यदायी  वातावरण आणि अतुलनीय निसर्ग सौंदर्यामुळे हौशी पर्यटक माथेरानला आवर्जून येतात.. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी येथे कोणतीही वहाने आढळत नाहीत.
शहरातील सगळा  प्रवास चालत , घोड्यावरुन नाहीतर माणसांनी ओढण्याचा रिक्षाने प्रवास करावा लागतो.केवळ मिनी ट्रेनच शहरात येते.दस्तुरी नाक्याजवळ आपोआपली सर्व वहाने पार्क करून पायवाटेने किंवा रेल्वेरुळावरुन चालत दोन -अडीच किमी जावे लागते.
दाट झाडी आणि लाल पायवाटा सगळीकडे दिसतात. सर्वत्र  कडेच आहेत.त्यालाच  'पॉईंट' म्हणतात.लोकेशनच्या आकारावरुन  पॉईंटचे नामकरण केलेलं असावं.तिथे इंग्रजी नावाचे अनेक पॉईंट आहेत.
पॉईंट बघायला जाताना ठसठशीत लाल पायवाटा दिसतात.झाडांची पानांवरही लाल धुरळा माखलेला दिसतो.
     कड्याखालील दृश्ये विलोभनीय दिसतात.धरतीची विविध रुपे,गर्द झाडीचे निसर्ग सौंदर्य आणि थंडगार वारा.झिरो टक्के प्रदूषणामुळे आरोग्यदायी वातावरणात सुखद थंडावा लाभतो..आम्ही पॅनोरमा, हार्ट, वन ट्री हिल,  एको, लँडस्केप, मंकी इत्यादी पॉईंटस बघितले.मस्तपैकी लोकेशनवर फोटोग्राफी  केली.जोडीचा फोटो काढायला भटकंती करणाऱ्या तरुण मित्राला विनंती करावी लागली. रेल्वेस्टेशनवर आलो
मिनी ट्रेन दुपारी होती.मग एवढा वेळ थांबण्यापेक्षा चालत जावूया असे पत्नीला  बोललो.तिनं होकार देताच धुळीच्या वाटेने जाण्यापेक्षा  रेल्वेरुळ मार्गाने  चालत चालत   जाण्याची  पहिलीच वेळ होती.सोबतीला इतर सहप्रवाशी येताजाता होते...याही चालण्याचा आनंदानुभव घेत होतो...उन्हाची वेळ होती एवढचं... वेगळाच फिल वाटत होता.दुतर्फा असलेल्या गर्द झाडीतून चालताना मजा वाटायची..वारं आलं की बरं वाटायचं .
निसर्गरम्य झाडी बघत,माकडे व पिल्ले बघत बघत .घाम पुसत पुसत, गप्पागोष्टी करत करत रमतगमत दस्तुरी नाक्याजवळ आलो.चालण्या फिरण्याने थोडासा थकवा आला होता.म्हणून तिथं थोडावेळ विसावलो.मस्तपैकी नाष्टा केला.थंडगार सरबत घेतले.वडापच्या मारुती व्हॅनने नेरळला आलो.घाट उतारताना किती अवघड वळणे चढ-उतार आहेत याची जाणीव झाली... काल फुलराणी मिनी ट्रेनने मस्त मजेदार प्रवास झाला होता...
    लग्नाच्या निमित्ताने एक मस्तपैकी हिलस्टेशन पहायला मिळाले.बरेच दिवस मनात रुंजी घालणारे निसर्गरम्य पर्यटनस्थळ बघितल्याचे समाधान वाटले इतर मित्रांनाही माथेरानला आवर्जून जायला सांगितले.पण  मिनी ट्रेनने निसर्ग सौंदर्य पहात जाण्याची सूचनाही केली.  माथेरानच्या निसर्गरम्य पर्यटनस्थळांचा निर्भेळ आनंद घेतला.
क्रमशः भाग--७५
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https:// raviprema.blogspot.com



प्रतिक्रिया

आपल्या देशातील वैभव आपल्या माध्यमातून पहायला मिळणे,अनुभवायला मिळणे ही माझ्यासारख्या आपल्या फॅनला पर्वणीच असते!
सर आपण अनुभव,वय,मान,सौजन्य,लेखक,कवी,आमच्यासाठी एक आदर्श गुरु या सर्वात समृद्ध तर आहातच....!
पण याही पेक्षाआपलं व्यक्तीमत्व खूपच संपन्न आहे.
एकंदर आपलं प्रत्येक पाऊल आमच्यासाठी नक्कीच दिशादर्शक असेल.
धन्यवाद सर!!!
श्री धर्मेंद्र दिक्षीत, वडवली,वाई 

निसर्ग प्रेमी हौशी अवलिया .....
     शब्दांचा सुद्धा चांगलाच प्रपंच मांडतात.     

खरचं आपल पर्यटन आपले अनुभव आम्हास प्रेरणादायी आहेत
   श्री संतोष ढेबे, महाबळेश्वर


Comments

  1. मस्तच पर्यटन स्थळ शुद्ध हवा

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड