माझी भटकंती रामोजी फिल्मसिटी भाग --७२

शालेय उपक्रम माझी भटकंती पुस्तक परिचय माझी ज्ञानमंदिरे Lifestyle प्रश्नपेढी सामान्य ज्ञान







                             माझी भटकंती


🎞️〰️🎞️〰️🎞️〰️🎞️〰️
        माझी भटकंती                         क्रमशः भाग-७२

📽️  रामोजी फिल्मसिटी

  दिनांक १० नोव्हेंबर २०१९
 🎡फेस्टिवल कॉर्निव्हल🎭

      तदनंतर आम्ही यात्रेत असणाऱ्या विविध खेळण्यांच्या दुनियेत  आलो.अम्युझमेंट पार्क सारखी विविध खेळणी.  मजाच मजा हवाई पाळणे,
मेरी-गो -राउंड,विविध पशुपक्ष्यांच्या आकारातील सभोवती फिरणारी खेळणी व पाळणे, जंपिंग जपांग इत्यादी खेळणी पहात  आवडीच्या खेळण्यात बसून स्वानंद घेत होतो.स्टॉलवरील विविध  खाद्यपदार्थांची चव चाखत आणि मनसोक्त फेस्टिव्हल मधील मराठी, हिंदी आणि इंग्रजी सिनेमातील गाण्यांवर होणारा दिलखेचक सदाबहार नृत्य बघत मौजमजा करत होतो. मनोरंजनाच्या विविधांगी आविष्काराचा आम्ही सगळे मनमुरादपणे आस्वाद घेत होतो.एका ओपन स्टेजवर डान्स शो  सुरू होता.सुपर दिलखेचक बहारदार नृत्ये सादर केली जात होती. प्रेक्षकांच्या आग्रहास्तव वन्स मोअर वरील गाण्यांवर  तरुणाई दिलखेचक डान्स करुन आनंद घेत होती...झिंग झिंग झिंगाट गाण्यावेळी तर बऱ्याच जणांची ठेका धरुन नाचून आनंद साजरा केला.सरशेवटी काही उत्साही पर्यटकांना स्टेजवर डान्स साठी बोलावून बहारदार डान्स सादर झाले...लय भारी नुसती धमाल तिथं त्यावेळी प्रचंड गर्दी होती .सगळेजण आनंदाचे क्षण साजरे करत होते..
 थोड्यावेळाने दुसरीकडील  (सकाळी उतरलेल्या) प्रशस्त मैदानावर आकर्षक पोशाखात बहारदार नृत्य सादर करत एकेका प्रसंगांचे डेकोरेटिव्ह  चित्ररथ  येऊ लागले.त्या चित्ररथावर नेत्रदीपक विद्युत रोषणाई अन् आकर्षक सजावटी प्रेक्षकांची नजर वेधून घेत होत्या. जणूकाही आपल्या कडील "शोभायात्रा'' हौशी प्रेक्षकांची गर्दी तिकडे बघायला उसळली.तिथं फेस्टिवल कॉर्निव्हल (चित्ररथांची शोभायात्रा ) उत्सव सोहळा सुरू झाला होता.एकापेक्षा एक अप्रतिम प्रसंगचित्रे पाहून आनंदाला उधाण येणारी 'आनंदयात्रा'च पहायला मिळाली. चित्र रथातील देखावे प्रादेशिक संस्कृतीचे ओळख करून देणारे वाटले.सरशेवटी खूप छान फेस्टिवल सोहळ्याने आजच्या दिवसाची मैफिल सजली..यादगारी मैफिल थी|
     सकाळी दहा वाजल्या पासून रात्रीचे आठ वाजेपर्यंत आम्ही सगळे फिल्मसिटीत  होतो.  ते क्षण मजेचे,
मनोरंजनाचे, फोटोसेशनचे,
नवनिर्मितीचे ,अवलोकनाचे,मायावी जादूचे आणि स्व-अनुभूती घेण्याचे झाले. चिरस्मरणीय राहिल  अशा  आनंदी दिवसाचा  नयनरम्य सोहळ्याने समारोप झाला.
आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघालेली झाडे,वेली
 ,कारंजे,वास्तू,कमानी,खांब आणि शिल्प  बघत बघत बस सुटण्याच्या ठिकाणी आलो.
सगळीकडे लाईटचाझगमगाट दिसत होता.
    बसने सकाळच्या प्रवेशद्वाराजवळ आलो... बसमध्ये एकच चर्चा किती भारी भारी लोकेशन, शुटिंग स्थळे ,मंदिरे आणि उद्याने रामोजी फिल्मसिटीत  एकाच ठिकाणी सर्व काही बघायला मिळाली.....सगळा  मित्र परिवार खुश ... तद्नंतर आम्ही हैद्राबादकडे मुक्कामाच्या ठिकाणी लकडीका ब्रीज या भागात आलो.. दिवसभर भटकंती केल्याने पायाला येणाऱ्या  वेदना अनेक मनोरंजक क्षणामुळे बोचऱ्या वाटत नव्हत्या...टोटल फुल डे  मनोरंजन आणि आनंदी आनंद.सुपर्ब लयभारी रामोजी फिल्मसिटी..... क्षणाक्षणाला उत्कंठा शिगेला पोहचविणारे सौंदर्य स्थळ....

⛲🎡🛣️🦋🎭💃🏻
क्रमशः भाग--७२
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https://raviprema.blogspot.com
                       








प्रतिक्रिया 
रवींद्र सर आपण केलेल्या पर्यटनाचे वर्णन खूपच बहारदार आहे लेखन शैली खूपच चांगली. दमदार शुद्धलेखनाचे नियम पाळून आपण लेखन केले आहे. लवकरच हे पुस्तक रुपाने निघावे असे मनोमन वाटते .केल्याने देशाटन हा छंद खूप चांगल्या रीतीने आपण जोपासला आहे .भावी वाटचालीस माझ्या हार्दिक शुभेच्छा !
श्री रमेश जाविर सर
काष्ठ्य शिल्पकार 


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड