माझी भटकंती बटरफ्लाय पार्क क्रमशः भाग-६८








🌱🦋🍀🦋🍀🦋🌱🍀🦋🌱
माझी भटकंती
क्रमशः भाग- ६८
🦋बटरफ्लाय पार्क हैद्राबाद🦋
 दिनांक- ९ नोव्हेंबर २०१९
🕸️🦗🕸️🦗🕸️🦗🕸️🦗🕸️🦗
नेहरु झूलॉजिकल  पार्क, हैद्राबाद येथील "बटरफ्लाय पार्क " पर्यटकांसाठी आनंदाची पर्वणी आहे....अनेक प्रकारची रंगीबेरंगी फुलपाखरं रानावनातल्या गर्दझाडीत ,  माळावरील गवतावर
,  घराजवळच्या बागेत आणि सभोवतालच्या हिरवाईच्या परिसरात   आपण पाहतो.अगदी तशीच आपल्याला अगदी जवळून पार्कमध्ये बघायला मिळतात.... खरोखरच मनमोहक आनंदी दृश्य अनेक  रंगीबेरंगी फुलपाखरं रंगीत फुलांवर बसून भटकंती करतानाचा क्षण बघताना मन उल्हासित होते.कविता मनात स्मरते
           फुलपाखरु
"एका आठवणीतून उडत
दुसऱ्या आठवणीत जाते "
'हसते खेळते मुक्त बागडते
जगते आयुष्य होऊन बेभान
तुझ्यावर इतके प्रेम करते
विसरुनी स्वत: देहभान.
क्षणात हसते क्षणात रुसते
जाते टिपूनी गोडवा मधाळ
फुल जाते सोडुनी त्याला
म्हणून आयुष्य त्याचे काही काळ'..
      हजारो फुलपाखरं एकाच ठिकाणी बघायला मिळतात..मन मोहरुन जाते.आमच्या  ट्रीपमधील बालचमू  फुलपाखरु बनून त्याच्यासोबत बागडत होता.मस्तपैकी फोटोग्राफी  स्वच्छंदतेने करत होतो.
    पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अनमोल खजाना फुलपाखरांच्या रुपात बनविलेलाआहे.सर्वासाठी निखळ मनोरंजनाचा आनंद.
     फुलपाखराची आकर्षक स्वागत कमान बघितली की सेल्फिचा मोह होतोच , भरपुर छोटीमोठी रंगिबेरंगी फुलझाडे,आकर्षक कारंजे व धबधबे पहात फुलपाखरांचे बागडणे पहातच रहावे असे वाटते.आनंदी क्षणांची फुलपाखरे बघत लयलुट करावी.इतके उत्तम विरंगुळ्यासाठी ठिकाण आहे.वय विसरुन फुलपाखरं बघताना आपण मुलं होऊन बागडतो.तिथे दगड व झाडांची रचना सुध्दा फुलपाखरांच्या विविध रुपात केली आहे...
नयनरम्य विलोभनीय आनंद देणारं ठिकाण.बटरफ्लाय पार्क पाहून नामांकित पशुपक्षी संग्रहालय पहायला गेलो.....
🦋🕸️🦗🦋🕸️🦗🦋🕸️🦗

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https://raviprema.blogspot.com





Comments

  1. छान लेखन .लोकेशन आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड