माझी भटकंती दक्षिण भारत दिवस सहावा वृंदावन गार्डन भाग क्र..६३

शालेय उपक्रम माझी भटकंती पुस्तक परिचय माझी ज्ञानमंदिरे Lifestyle प्रश्नपेढी सामान्य ज्ञान




🌹❄️🌻❄️🌻❄️🌻❄️🌻🌻❄️
माझी भटकंती क्रमशः भाग-६३
दक्षिण भारत सन -२००१
वृंदावन गार्डन 

 💫❄️ विलोभनीय  पर्यटनस्थळ 🎼🥀💫

🌹🥀🌹🥀🌹🥀🌹🥀

🌹🥀🍁 वृंदावन गार्डन 🍁

          सहावा दिवस
क्रमशः...
म्हैसूर
पॅलेस पाहून आम्ही जगप्रसिद्ध वृंदावन गार्डन कडे प्रस्थान केले...कावेरी नदीच्या कृष्णराजा सागर धरणाच्या पायथ्याशी विस्तीर्ण व भव्य दिव्य गार्डन आहे... अंधार पडायच्या अगोदर सर्वजण विस्तीर्ण जलाशय पहायला धरणाच्या भिंतीवर गेलो.. सूर्यास्ताच्यावेळी जलाशयाचे व सभोवतालचे दृश्य अप्रतिम दिसत होते.रमणीय मनमोहक दृश्य ...
मग गार्डन पहायला पायथ्याशी आलो.... धरणाच्या पाण्याचा कल्पकतेने वापर करून विविध ठिकाणी रंगीबेरंगी कारंजे विविध आकारात बघायला मिळाले.वृक्षवेलींच्या विविध रचना, विविध रंगांची फुलझाडे,लॉनवर उडणारे तुषार सिंचन.. विविध प्रतिकृती,, रंगबिरंगी लाईटव्यवस्था, खाऊच्या पदार्थांची रेलचेल आणि विविध खेळण्यांची दुकाने.... विविध दृश्ये बघण्यात मशगुल  झालो. लॉनवर काही वेळ अनवाणी चालल्यावर पायांना होणा-या मुलायम स्पर्शाने वेगळेच थ्रील वाटत होते.. रमणीय मनमोहक दृश्य बघत आनंदाने विविध पोजमध्ये फोटोग्राफी केली.. गार्डन मधील सुंदर स्पॉट बघण्याचा निखळ आनंद घेतला. आमच्यातले काहीजण तर गवतावर उड्यामारत धमाल करत होते.इथं यायला खरंच हौस पाहिजे.कितीतरी मनमोहक दृश्ये बघायला मिळत होती... आखीवरेखीव रचनेतील फुलझाडे पाहून आनंदित होतो.
अप्रतिम लयभारी गार्डन बघून सगळे दोस्त कंपनी जामखुश.   वृंदावन गार्डन  पाहून आमचा  ड्रायव्हरही जामखुश झाला..
      गार्डन मधील मास्टर ब्लास्टर शो सुरु झाल्याची सूचना झाली...सगळेजण अंधारातील ""म्युझिकल फाऊंटन""शो पहायला गर्दी करु लागले... संगीताच्या तालावर रंगीबेरंगी कारंजाचा नृत्याविष्कार सुरू झाला.. नयनमनोहर डोळ्याचं पारणं फेडणारं दृश्य... अप्रतिम... सोहळा अंधारामुळे गार्डन मधील आकर्षक विद्युत रोषणाई नजरेत भरत होती... अप्रतिम मानवनिर्मित सौंदर्य....शो संपल्यावर लहानमुलांसाठी  खेळणी घेतली.. अप्रतिम गार्डनचा फाऊंटन विथ लाईट डान्स शो व कलात्मक फुलझाडांचे डेकोरेशन पाहून आनंदित झालो...शो पाहून डोळ्याची पारणं फिटली..शो संपल्यावर गर्दीतून वाट काढत गाडीजवळ आलो.... म्हैसूर मध्ये  लॉजिंग करुन रुटीन प्रमाणे चिकन रस्सा,भाकरी व भात,व्हेजपुलाव इत्यादी पदार्थ तयार करून मस्तपैकी जेवलो.. 
शुभ रात्री...
क्रमशःभाग क्रमांक-६३

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https://raviprema.blogspot.com





Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड