Posts

Showing posts from 2020

गारांचा पाऊस काव्य पुष्प -१८७

Image
      गारांचा  पाऊस  ढग दाटून आले आभाळ श्यामल झाले मेघ  गर्जत  आले वारं वेगाने सुटले| पावसाची चिपळी वाजली  गारा, जलधारा बरसली  गारांचा ताशा  ठेका धरतोय  संबळ,हलगी वाजवतोय|  गार वाऱ्याची झुळूक येती  काहिलीला गार करती मातीतली ढिकळं इरघळती  कणकण एकजीव होती | गारवारं सुटलय मंद  माहोल झालाय बेधुंद   ढगाळी हवा कुंद दरवळलाय मृदेचा गंध | श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई  काव्य पुष्प-१८७

लग्नासवे प्रवास वर्णन

Image
[12/30, 9:46 AM] santosh shinde np: *विवाहसोहळा* .. _एक निमित्त_         जुळल्या तारा प्रितीच्या         मैफिल नात्याची सजली         ऋणानुबंधाच्या पडल्या गाठी        युगायुगांची नाती जुळली     अथांग जनसागरात आपल्या जीवनाची साथ शोधायची,आशा,आकांक्षा,आवड आणि निवड यांचा मेळ घालायचा आणि सप्तपदीच्या पाऊलखुणांनी गृहस्थाश्रमाचा उंबरठा ओलांडण्याचा सुरेल सोहळा म्हणजे विवाह.खरसुंडीच्या अविस्मरणिय प्रवासातील परिचयाच्या गाठी आपल्या स्वभावकौशल्याने दृढ करणारे आणि आपल्या असामान्य काव्यकौशल्याने साहित्यिक,सांस्कृतिक,वैचारिक प्रभाव टाकणारे मित्रवर्य श्री रविंद्रजी लटिंगे यांच्या चिरंजिवाच्या,हर्षदच्या शुभविवाहास आपली सदेह उपस्थिती दर्शवावी आणि अनायासे कराडला जायचेच आहे तर त्या निमित्ताने समस्त शैक्षणिक विश्वाच्या आकर्षणाचे निमित्त झालेल्या,अवलिया भटकंतीकार अप्पांच्या लेखनकौशल्यातून संपूर्ण राज्यभर सुप्रसिद्ध झालेल्या शाळकरीचीही मजा चाखावी हा अंतस्थ हेतूही मनी ठेऊन डिसेंबरच्या कडाक्याच्या थंडीतही मनाने चिरतरुण चिकणे...

माझं लेणं कुंकू काव्य पुष्प-१८६

Image
माझं लेणं कुंकू न्याहाळते आरश्यात रुप माझं लेवते मी सूर्यावानी कुंकू माझं सौभाग्याचं लेणं कुंकू माझं  कपाळी शोभते कुंकू माझं || सुवासिनीन  मी ग  रोज मागते मागणं  माझ्या धन्याला बळ दे सुखा समाधानात नांदणं|| संसारात फुलेल चांदणं  तुला करीते वंदन  आभाळमायेचं फुलणं घर होईल नंदनवन|| सौभाग्याचा अलंकार  कपाळी शोभतो  शुभविवाह प्रसंगी भाळी मळवट सजतो|| श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प-१८६ यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https://raviprema.blogspot.com

बहरली मायेची बाग काव्य पुष्प-१८५

Image
🍁🌿🍁☘️🍁🍀🌹🌺🌸 ***** बहरली मायेची बाग  बहारदार नजारा जास्वंदीचा नयनांना तृप्त करण्याचा  आनंद मोद वाटण्याचा  टपोऱ्या नक्षीमय आकाराचा  गुलाब जास्वंदीची रंगीत फुले  भगवे जास्वंद नजरेत भरले  द्वारी फुलोऱ्यांनी स्वागत झाले  क्षणभर पाय तिथंच रेंगाळले|| पुष्पांनी मोहिनी घातली हर्षाची पखरण झाली  वाटिका सेलिब्रिटी झाली  तिच्या सवे दृश्ये चितारली || अभ्यागतांना भुरळ घालते  आनंदाचे शिंपण करते  घराचे सौंदर्य वाटिका खुलविते   घरभेट मनगाभाऱ्यात  रेंगाळते|| गंध फुलांचा सदैव दरवळे  रंग फुलांचा जीवनात उधळे  फुलांनी फुलवावे स्नेहाचे मळे वेलीवर बहरतील मैत्रीची फळे|| श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प-१८५ यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https://raviprema. blogspot.com

सूर्योदय काव्य पुष्प-१८४

Image
      सूर्योदय सूर्यानारायणाच्या प्रतिक्षेची  आतुरता चराचराला लागती  पुर्वेला आकाशी गुलाल उधळीत  आगमनाची किरणे तेजोमय दिसती || नेत्रदीपक रंगाविष्काराची ढगांना झळाळी  शुभसमयी न्याहाळताना मोहिनी घालते  भगवी लालभडक मेघांची छटा  पाहता क्षणी भान हरपते|| रम्य दृश्य अवनिचे दिसती वृक्षराजींचे डोंगर सजती  किलबिलाटाने घरटी सोडती स्वैरपणे पाखरं संचारती|| उगवतीला पहा जरा  उदयाचा आसमानी नजारा मैदानावरुनी दिसतो खरा  तनमनाला स्पर्शे वारा || श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प-१८४

सूर सनईचे काव्य पुष्प-१८३

Image
🎼सूर सनईचे🎹 सनईचे सूर कानी आले  मंगल माहोल निर्मिले विवाह सोहळ्याचा स्नेह आनंद वाढे  जेव्हा पाहुण्यांची गळाभेट घडे|| सनईचे मंजूळ सप्तसूर  साथीला चौघड्याचा निनाद  रागांच्या सूरावटीचा मधूर आवाज  मंगल वाद्याचा सुस्वर नाद||  सुरांचे गुंजन रांगांची धून  श्रवणिय गाण्यांनी मैफिल रंगली सनई चौघड्याची जुगलबंदीने ताल सूरांची गट्टी जमली||  तरल भावनांचा सुषिर आविष्कार सनई चौघड्याचे वादन बहारदार  विवाह वेदीवरचं सुरेल पान मंगल सूरांची सौंदर्य खाण|| श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प-१८३ यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https:// raviprema.blogspot.com

प्रितीसंगम घाट काव्य पुष्प-१८२

Image
☘️प्रितीसंगम घाट ☘️ कृष्णाबाई घाट कराडची चौपाटी  शीतल सायंकाळी गर्दी फुलती  खाद्य पदार्थांची खवय्येगिरीची चव रेंगाळते जीभेवरी ❗ विरंगुळ्यासाठी गर्दी लोटती  कृष्णाबाई  घाटावरी कृष्णा-कोयनेच्या संगमावरी घंटानाद घुमे कृष्णेच्या मंदिरी ❗ उंच डेरेदार वृक्षांची तोरणं फुलझाडांनी परिसर फुलणं हिरवळीवर बैठक मांडणं  गप्पागोष्टीचा आनंद घेणं❗ भेळ पाणीपुरी यथेच्छ खाणं बालपणीच्या आठवणी उजाळणं कराडला गेलोकी घाटावर होतं जाणं भेटीनं मन होतं ताजतवानं❗ श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प-१८२ यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https:// raviprema.blogspot.com

माझं गाव ओझर्डे काव्य पुष्प-१८१

Image
           ओझर्डे माझं गाव चंद्रभागेच्या ओढ्याकाठी माझं गांव श्री पद्मावती देवीचे सर्वदूर नांव श्री सोनेश्वर महाराजांचा कृपाप्रसाद श्री तुळजाभवानी देवीचा आशिर्वाद || विठ्ठल रखुमाईची अभंगवाणी शिवारात खळाळतं कृष्णेचं पाणी राउळीशोभे लक्ष्मण रामसीता पिंपळा समोरी हनुमान दाता|| मायमाऊली तुकाबाई माता संगतीने लक्ष्मीबाई माता माझं गाव ,ओझर्डे  गांव सामाजिक भान जपणारं गांव || सोंगांची परंपरा जपणारं गांव यात्रा नवरात्रौत्सव करणारं गांव बागायती शेती फुलविणारं गांव क्रिकेटच्या स्पर्धा भरविणारं गांव || पुरोगामी विचारांचे प्रेरक गांव विकासाच्या योजना राबविणारे गांव समाजाची वाहवा मिळविणारे गांव शासकीय सन्मान झालेले गांव || समस्त जनांचे सहकार्य लाभते तिथं आनंदाने सुखसमृद्धी नांदते श्री पद्मावती देवी सुखात ठेवते सदैव आम्हा  कृपाछत्र लाभते|| श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प--१८१

पुरणपोळी काव्य पुष्प-१८०

Image
पुरणपोळी  सणवारांची मिष्टान्न मेजवानी  धार्मिक कार्यात नैवेद्य अग्रमानी   पुरणपोळीचा बेत करु का धनी धजल्या घरातल्या सर्वजणी ||   तेलची पोळी कटाची आमटी वरण भाताची मुद चटकदार भजी  लिंबाची फोड मीठ चिमूटभर  कुरडई पापड मेथीची भाजी||    मन लावून रांधलेला स्वयंपाक आग्रहाच्या अगत्याने वाढणं   गरमपोळीवर तूपाची धार  गुळवणी संग मनसोक्त खाणं || आईच्या हातच्या चवीचं  कवतिक सारी करती  कटाची पिवळी आमटी वाटीतली फुकूण फुरकती || भोजनाची बसली पंगत  गरम पोळी येता ताटी  गुळवणीला पोळीचा घास  मिष्टभाषणी करत खाती|| श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प-१८० यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https://raviprema.blogspot.com

प्रश्नमंजूषा शुभेच्छा ❗ काव्य पुष्प-१७९

Image
प्रश्नमंजुषेचा अवलिया   (श्री नितीन जाधव सरांची प्रश्नमंजूषा उपक्रम   ) सर्जनशीलतेचा ध्यास घेऊनी   वाचण्याने वेचक शोधती  माहितीचे करण्या उपयोजन बनवती अचूक प्रश्ननिर्मिती || सामान्यज्ञान करण्या वृध्दिंगत  सर्वच विषयांचा अंतर्भाव करती  सुसंगतपणे मांडणी करुनी  विद्यार्थी गुणवत्तेचा आलेख साधती || विद्यार्थ्यांची वाढवण्या गुणवत्ता प्रश्नमंजुषा मालिकेचे शतक ठोकले  दर्जेदार प्रश्र्नांची झाली सुबत्ता  प्रश्नांचे सदर ई -पेपरात  झळकले || प्रश्नमंजुषा मालिकेचे उभारले पर्व  कौतुक करती मित्रगण सर्व  पुस्तकरूपाने प्रकाशित करायला   हीच सदिच्छा आपल्या उपक्रमाला|| श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प-१७९ यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https://raviprema.blogspot.com

चुलीवरची भाकरी काव्य पुष्प-१७८

Image
चुलीवरची भाकरी बसायला घेतला पाट  चुलीचा मंदाग्नी थाट  परातीत मळलेले पीठ  जीवनातले भोजन पीठ || तावाने भाकरी भाजते  निखाऱ्यावर ती शेकते  चटके ताव सहन करते तावून सुलाखून निघते || एक भाकरी तव्यावर  एक भाकरी निखाऱ्यावर  चवड भरली टोपल्यावर  फुगलेली खरपूस भाकर || पापुडयाची लालसा झाली   पाहूनी तोंडाला सुटे पाणी पण बोटांना वाफ लागली  भरलं मन नुसतं पाहूनी || खलबत्त्यात ठेचा मिरचीचा  कालवण करण्या भाजीचा चुलीवरल्या भाकरीचा  घास खातो समाधानाचा|| श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प-१७८ यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https://raviprema.blogspot.com फोटो सौजन्य फेसबुक

किरण शलाका काव्य पुष्प-१७७

Image
💫किरण शलाका💥 नेत्रदीपक मनमोहक रूप अस्ताला जाणाऱ्या दिवाकराचे  भंडाऱ्याच्या मुक्त उधळणाने   शिंपण झाले रंगाविष्काराचे || चराचराला ऊर्जा देणारा  डोंगरा पल्याड निघाला  प्रकाशाने मावळतीला  सोनेरी किरणोत्सव झाला || तेजाने किरण शलाका तळपली  फोकस दिसे वर आकाशी  तेजोमय प्रकाश किरणांचा कवडसा पडला वसुंधरेशी || स्वागत करती ऊसाचे तुरे  रम्य दृश्याने मन  बावरे  कुंचल्यातून चितारलेले  सूर्यास्ताचे सौंदर्य  पहा रे || श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई  काव्य पुष्प-१७७ यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https://raviprema.blogspot.com

संत गाडगेबाबा काव्य पुष्प-१७६

Image
विनम्र अभिवादन ❗ संत गाडगेबाबा  माणसात देव पाहणारे संत मनाची स्वच्छता करणारे संत  लोकजागृतीचा वैचारिक पंथ सदैव जपणारे आधुनिक संत || केली खराट्याने ग्रामस्वच्छता      किर्तनाने झाली मनाची स्वच्छता समाजमनात मिळविली सत्ता गिरवूया त्यांच्या विचारांचा कित्ता || अंधश्रद्धेला अजिबात थारा नाही बुरसटलेल्या विचारांना चालना नाही  शिक्षणा शिवाय तरणोपाय नाही  रुण काढून सण साजरा नाही|| गाडगेबाबांचे हे विचार रुजवूया  माणसातील माणुसकी शोधूया  भुकेल्यांना अन्न पशुपक्ष्यांना अभय  सगळ्यांना करावे निर्भय|| शाळा हेच ज्ञानमंदिर थोर  हेच जीवनाचे खरे सार  मदतीचा ओघ वाढवा फार  शिक्षणाने मिळेल आधार|| काव्य पुष्प-१७६

आंब्याचा मोहर काव्य पुष्प-१७५

Image
आंब्याचा मोहर  आमराईतल्या झाडावरती  मोहर लागला दिसू  गंध दरवळे सभोवती  निवांतपणे सावलीत बसू || हिरव्यागार पानांच्या पुढे मोहराचे झुबके लोंबती  वाऱ्याच्या संगतीने  पानं फुलं सळसळती || बहरलेल्या पिवळ्या मोहरातून  इवल्या इवल्या कैऱ्या लगडती  तोंडाला मग पाणी सुटते  नकळत हाती दगडं येती|| नेम धरुनी दगड भिरकावतो  अचूक माराने कैऱ्या पडती  कोण हायरे तिकडं आवाजाने घाबरगुंडीने  धांदल उडती|| पटकन कैऱ्या उचलून   तकाट पळत सुटतो   चटणीमीठा बरोबर कैऱ्या मिटक्या मारत खातो|| श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प-१७५ फोटो सौजन्य श्री दादासाहेब कुदळे व सतिश जगताप सर यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https://raviprema.blogspot.com

थंडीचा महिना हिवाळा काव्य पुष्प-१७४

Image
थंडीचा महिना (हिवाळा ) दिवाळीत पहाटे अभ्यंगस्नान घडते  थंडीची मग चाहूल लागते  गारठा पडायला सुरुवात होते दिवस लहान तर रात मोठी होते || रम्य पहाटे फिरायला जावूया  रामप्रहरी व्यायाम करुया  उबदार कपडे परिधान करुया  आरोग्याची काळजी घेवूया || शेतशिवारात फेरफटका मारत  पाहूया गवताच्या पात्याची नक्षी दैवाराची पानांपानांवर चमकती मोती    साक्ष पिवळसर प्रकाशाच्या किरणांची  ||  गारठ्याने भरु लागली हुडहुडी  की चघाळाची करुया शेकोटी  शेकत शेकत गप्पा मारत  हास्यविनोदाची करुया शाब्दीक कोटी || वाढत्या क्षुधेला गरम चमचमीत चटकदार मेनूंनी करुया शांती  सेवन करायला स्निग्ध पदार्थ  हरभऱ्याची भाजी पावट्याची आमटी  || महाबळेश्वरची गुलाबी थंडी  अनुभवायला पर्यटक जाती वाऱ्याच्या थंडगार स्पर्शाने  तन मनाला मोहित करती|| श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प-१७४ यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https://raviprema.blogspot.com फोटो सौजन्य फेसबुक.

काव्य पुष्प-१७३,फुलपाखरु

Image
     🦋 फुलपाखरु   फुलपाखरा सवे होऊया सान  रंगबिरंगी पंख छान छान  फुलांफुलावरती स्वच्छंदपण   विहारती शोषायला मधूकण ||  रुप सुंदर मोहक ते  इवलेशे पंख फडकविते  फुलावरी क्षणात बसते पकडण्या मन अधिरते || तयाला धरण्या पळत जाणे  क्षणात त्याचे भुर्रकन उडणे स्वैर भरारीने मुक्त फिरणे दुसऱ्या फुलाला बिलगणे|| क्षणात बसते क्षणात पळते  मुक्तपणे सभोवती फिरते  नाना छटेचे गोजिरे रुप ते  फुलझाडे बघताना नजर वेधते|| फुलपाखरांचे मुक्त भिरभिरणं मधकण टिपत मस्त जगणं   स्वैर फिरण्याचा आनंद वाटणं मनाच्या गाभाऱ्याला तृप्त करणं|| श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प-१७३ फोटो सौजन्य फेसबुक श्री दशरथ गायकवाड यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https://raviprema.blogspot.com

फडातली कोप काव्य पुष्प-१७२

Image
🎋🎋🎋🎋🎋🎋🎋 ऊसाच्या फडातली कोप कारखान्याची धुराडी पेटली  ऊसकामगारांची टोळी आली  गावच्या बाहेर झोपड्या घातल्या  भल्या सकाळी फडाकडे निघाल्या || फडातल्या उसाची कोप केली  वाढ्याच्या पेंढीनं सावली धरली  मायेने लेकरास्नी घरटं केलं निरागस हास्य तोंडाव उमटलं|| धन्यासंग काबाडकष्ट करती  मोळी बांधती,ऊस सोलती   उन्हातान्हात राबराब राबती  संसाराचा गाडा जोडीनं हाकती || शिवारात झोपड्या घालून राहणं ऊसतोडणीचं काम करणं  रोज नवं बांध धुंडाळित  ऊसतोडीच काम करणं || भविष्य उद्याचं कसं घडावं शिक्षण रोजगाराचं कोडं सुटावं हाताला काम गरीबाला धन  वंचिताला कृतीयुक्त शिक्षण|| श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प-१७२ फोटो साभार फेसबुक किरण पाटील यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https://raviprema.blogspot.com

अथांग जलाशय दासवे काव्य पुष्प-१७१

Image
अथांग जलाशय शांत शीतल स्वच्छ जलाशय  एकटक पाहताना भान हरपले  प्रदुषणविरहीत स्वच्छ हवा  मन प्रसन्न तजेलदार झाले | अगणित तरंग लहरी  जलाशयात उठतात  मनातल्या विचार तरंगाना  क्षणभर विसावा देतात| स्वच्छ सुंदर नितळ पाणी  पहात बसलो सुखासनी  ध्यान लागते बगळ्यावाणी पक्ष्यांची गुंज येते कानी| रम्य परिसर ओढ वाढवे  निसर्ग सौंदर्याला तनमन भुलले  वेचक वेधक दृश्ये न्याहाळले  मोबाईल मध्ये चित्र टिपले | श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प-१७१ यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https://raviprema.blogspot.com

आण्णांना विनम्र अभिवादन काव्य पुष्प-१७०

Image
आण्णांना विनम्र अभिवादन ❗ (आभाळा एवढं कार्य शिक्षकांसाठी करणारे झुंजार शिक्षक नेते आदरणीय माजी आमदार स्व.शिवाजीराव पाटील ) शिक्षकांच्या आराध्य दैवताच्या कार्यकर्तृत्वाचा सुगंध दरवळे  नेते प्राथमिक शिक्षक संघाचे ज्ञानयात्रींचे जीवनमान फुलवले❗   महाराष्ट्राची मैदानी तोफ  शिक्षक अधिवेशनात गर्जे  शिक्षकांचे ज्वलंत प्रश्न   अभ्यासपूर्वक शब्दात सजे ❗ संघटन कौशल्याने संघटना उभारली  अस्मितेने  प्रश्र्नांची उकल केली  अधिवेशनात मागण्यांना मंजूरी मिळवली  शासन दरबारी पत वाढविली ❗ शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी  सदैव अहोरात्र कार्यरत राहिले  हजरजबाबी समयसुचकतेने  शिक्षकांचे प्रश्न अविरतपणे सोडविले ❗ संघटनेच्या संवर्धनासाठी एक होऊया  शिक्षकांच्यात नवचैतन्याची लाट आणूया  आपले साम्राज्य आपणच वाढवूया  हीच श्रद्धांजली आण्णांना अर्पूया ❗ आण्णांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन🌹🙏🏻 श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प-१७० यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https://raviprema.blogdpot.vom

माउंटन लेक सिटी काव्य पुष्प-१६९

Image
☘️🍁☘️🍁🌿🍁🍃🌳  माउंटन लेक सिटी (लवासा ) डोंगराच्या कुशीत वसवली  माउंटन लवासा लेक सिटी  रमणीय दृश्याने मोहिनी घातली   निळ्या डोंगराच्या घडल्या भेटी | दुतर्फा हिरव्या झाडीत इमले  डोंगराच्या मधे मनमोहक तळे रफेट करायला सैर बोटींची  डिझाईन दिसते कलात्मकतेची| मुक्तपणे भटकायला मस्तच ठिकाण दृश्ये टिपायला सेतूचा बांध  मोबाईलवर दृश्यांना टिपले  मनाच्या गाभाऱ्यात साठवले | रंगरुप पाहूनी सह्याद्रीच्या माथ्याचे  क्षण आनंदाने मजेत गेले  लय दिवसांची सफलता झाली  दोस्तांसंग मौजमजा केली| श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प-१६९ यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https://raviprema.blogspot.com

सूर्योदय पाणलोट क्षेत्र काव्य पुष्प-१६८

Image
🛶सूर्योदय पाणलोट क्षेत्र🛶 प्रभाते नारायणाची किरणे प्रकटली  लालसर पिवळसर छटा आली  शांत जलाशयाच्या बिलोरी आरश्यात  डोंगराची प्रतिमा वलयांकित दिसली| सकाळच्या नीरव प्रहरी     दिसली डोंगरछबी भारी आरस्पानी सौंदर्य जलाशयाचे  दृश्य मनमोहक डोंगररांगांचे | हिरव्यागार पालवीवर जलबिंदू सजले  झाडाच्या डहाळीवर पक्षी बसले  पक्ष्यांच्या किलबिलाटाने   नजर वेधली   जलावरुनी उडताना खगमाळ  दिसली| स्वैर मुक्तपणे विहंगम संचार  आकाशाच्या नजारा बहारदार सभोवती दृश्यस्थळे फारच फार बोटीतून केली सफर पार | श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प-१६८ यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https://raviprema.blogspot.com

नवलाईची टेकडी काव्य पुष्प-१६७

Image
🏞️ नवलाईची टेकडी ⛰️     रायरेश्वराच्या डोंगररांगेतील  उपशाखेवर पांडवगड ऊभा   मांढरदेव घाटातील मालवाठारच्या  टेकडीवर कातळात पक्षी जटायू ऊभा  || टेकडीच्या माथ्यावरील रुप कातळाचे  माथ्यावरुन भासते रुप जटायूचे  करवंदाच्या जाळ्या गवत पिवळे  झाडावर बसून सिनरी न्याहाळे || आडबाजूच्या वाटनं जाती नजरेत भरती डोंगर पाणी  नयनरम्य परिसरात गुंजती  पानांसवे वाऱ्याची गाणी || कांचन रोपटी सभोवती सावलीत गप्पा झोडती  भटकंतीची अनवट वाट  तिथं भेटतो अद्भुत थाट|| श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प-१६६ यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https://raviprema.blogspot.com प्रतिक्रिया.... काळी मैनेचे पसरे जाळे , दगडधोंड्याचा डोंगरावरी l निसर्गाच्या या आड वाटेवर, मनासह आरोग्य प्रसन्न करी ll सागर गजरे  कराड 

मैत्री टूर काव्य पुष्प-१६६

Image
    🤝मैत्री टूर 🤝 भटकंतीच्या सुरुवातीला झाला  दुसऱ्या गाडीचा खोळंबा   मग मांढरदेव घाटातल्या   मालवाठारला घेतला थांबा || नयनरम्य डोंगररांगा धरण  पाहुनी झाला अचंबा  हवा बदलाने तनमनाला होऊ लागला वाऱ्याचा झोंबा ||   घाटातला निसर्ग नजारा पहायला मन रंगले  मनसोक्त पोजमध्ये  मजेमजेचे फोटो टिपले|| विहंगम दृश्य नदीच्याअलंकाराचे  हिरव्या पिवळ्या रंगछटेचे  फोटोत टिपले गठबंधन मैत्रिचे  चेहऱ्यावर उमटले हास्य समाधानाचे|| निसर्गाच्या सान्निध्यात भटकताना  वाऱ्याच्या झुळकीने तन मोहरले हिरव्यागार झाडांच्या पानांचे पुंजके  उठावाच्या रांगोळीचे ठसे भासले|| श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प-१६६ यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https://raviprema.blogspot.com

भटकंती काव्य पुष्प-१६५

Image
          भटकंती   सह्याद्रीच्या डोंगररांगा मनमोहक विहंगम   अनवट वाटेने पायदळी तुडवायला आव्हानांना सामोरे जायला पाहिजेत दम दुर्ग किल्ले डोंगर दऱ्या भटकंतीला || दोस्तांसंग निसर्ग भटकंतीने  मनाला मिळते परमसुख  निसर्गसृष्टीच्या नजाऱ्याचे  नयनी लाभते नेत्रसुख || विरंगुळ्याची ठिकाणं हमखास  तनमनाला देती आनंदसुख  निसर्गसोबत्यांच्या सहवासाने  क्षणभर धूसर करती दु:ख || निसर्गाचं सौंदर्य  मनसोक्त न्याहाळूया   वनाची जैवविविधता  गाईडकडून ऐकूया || परोपकाराची कृतज्ञता  मनापासून जाणूया  पर्यावरणासाठी एकीनं सदैव काम करुया || श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प-१६५ ☘️🍁🌿☘️🍁🌿☘️ यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https://raviprema.blogspot.com

म्हैस काव्य पुष्प-१६४

Image
  ☘️🍂 म्हैस जलाशयाच्या काठी कुरण   गवतात तिथं म्हैशी चरती  पाळीव दुधाळू जित्राब धन्याला जीव लावती | शेतकऱ्याची जीवदौलत  शेतीवाडीला खत देती  शेतकऱ्याची उपजिविका  दुधा ताक लोण्यावर भागती| काळाभोर रंग बाकदार शिंग  समोर आडवं आलेल्याला ढुश्या मारती  हाल्या हाल्या हाल्या आवाजाला  रेकून राखोळ्याला साद देती | म्हैशीची भारी चित्तरकथा  आदरणीय पु.लं.नी लिहिली  बिन कामाच्या नवरा सिनेमात  म्हैस सुध्दा सेलिब्रिटी झाली| श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प-१६४ यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https://raviprema.blogspot.com

शेतीचा हंगाम काव्य पुष्प-१६३

Image
🌿🌱🌴🌿🌱🌴🌿        सुगी(हंगाम)      आभाळ भरले    मेघ दाटले वारा सुटला पाऊस आला| थेंब टिपकले मोती झाले जमीन भिजली कुळवणी केली| गंध दरवळला वापसा आला बीजपेरा केला पाऊस आला| बीज अंकुरले शिवार फुलले कोळपणी झाली खुरपणी केली|  धारा नाचू लागली  फुलोऱ्यात पिकं आली  सुगंध दरवळला शेतकरी आनंदला| मशागती केली संजीवनी दिली  घाम गळला धरेला मिळाला|  पाखरांचे फिरणे फुलपाखरांचे भ्रमणे परागसिंचन झाले शिवार फुलले|   शेंगा दिसती  दाणे पोसती   शेंगा भरती सोनेरी दिसती| सुगीला सुरुवात झाली काढणीला रोजगारी केला एकाएकी वारा सुटला हवेत बदल झाला| आभाळ गरजले नभ कोसळले धोपटवणी पडले तळे साचले| पीक भिजले काही नासले खराब झाले उन् पडले| उरलेले काढले वाळवले रचले राखनी केली मळणी केली| पाखडणी केली वाळवणं केली रास लागली पूजा केली| कणगीत भरले गर्जेपुरते ठेवले बाजारी धान नेले घेेेवाऱ्याला विकले| धान्याचा पैका मिळाला उदरनिर्वाहाला वापरला सलाम करुया अन्नदात्याला त्याच्या काबाडकष्टाला | विदारक परिस्थितीची सत्य कथा आशयघन शब्दात गुंफली व्...

ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते काव्य पुष्प-१६२

Image
सन्माननीय श्री रणजित डिसले सर.आपले हार्दिक अभिनंदन❗आपण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी राबविलेल्या अभिनव प्रायोगशिल उपक्रमास जागतिक ग्लोबल टिचर पुरस्काराने सन्मानित करुन गौरव केला.याचा आम्हास सार्थ अभिमान वाटतो❗ आपणास शतशःसलाम आणि मानाचा मुजरा❗🌹🙏🏻🌹 💫हार्दिक अभिनंदन❗ श्री रणजित डिसले सर ,ग्लोबल टिचर  पुरस्कार विजेते सर्वोत्तम शिक्षक  जागतिक ग्लोबल टिचर  पुरस्कार विजेते शिक्षक सन्माननीय  रणजित  नव्या टेक्नोलॉजी तंत्राने विद्यार्थी गुणवत्ता संवर्धित || सन्मान प्राथमिक शिक्षकाचा  नवतंत्र विकसित क्यू -आर कोडचा  गौरव प्राथमिक शिक्षणाचा  महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याचा || अभिमानाचा गौरव आहे  श्री रणजित डिसले गुरुजींचा  अंतिम फेरीतील सहकाऱ्यांना निम्मं बक्षीस बहाल करणाऱ्या दातृत्वाचा|| पहिलेच भारतीय शिक्षक  म्हणून मानांकित होण्याचा  आंतरराष्ट्रीय जागतिक पुरस्कारांवर  सोलापूरची मोहोर उमटविण्याचा|| श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प-१६२ यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. htt...

प्रिशा वाढदिवस शुभचिंतन काव्य पुष्प-१६१

Image
आमची नात प्रिशाला वाढदिवसाच्या हार्दिक खुप खुप शुभेच्छा ❗ हसरी लाडली प्रिशापरी  जशी भवऱ्याची अरी फिरायला अवखळ भारी  नव्या गोष्टींनी अचंबित करी| आजी दिसली की बाबा कुठंय बाबा दिसले की आजी कुठंय खेळकर,अवखळ आहे हे खरंय पण करुन बघायला लय आवडतय| हॅलो आवाजाने मन् मोहरते छबी दिसली की मन आनंदते  व्हिडिओ बघितला की मन हर्षते  नाचगाणे बघितले की मन  प्रफुल्लते| फोटो काढायची हौस भारी स्मितहास्य चेहऱ्यावरी मुक्तपणे सभोवती फिरी  घरभर खेळाचा पसारा करी | आता लागली दुडूदुडू धावू डब्यावर उभारुन घेई खाऊ  हसऱ्या प्रिशाची पापी घेवून   लाडानं म्हणतो मी माऊ माऊ | काव्य पुष्प-१६१ श्री रविंद्र लटिंगे (आजोबा) ओझर्डे  वाई

वाचन साखळी काव्य पुष्प-१६०

Image
📚📔वाचन साखळी📔📖✒️📚 वाचन संस्कृतीची चळवळ रुजवायला  वाचन साखळी फेसबुक ग्रुप  पुस्तके वाचनाची उत्कंठा वाढवायला  पुस्तक परिचयाने येते हुरुप || व्यासंगी छांदिष्टय भगिनींनी      वाचन साखळी चालविली पुस्तक परिचय लेखातून  विविध साहित्याची शिदोरी मिळाली|| प्रतिभा लोखंडेताईंनी वाचन साखळी गुंफली  प्रतिभा टेमकरताईंनी  वाचन साखळी जोडली || प्रतिभावंत लेखकांचे साहित्य प्रतिभेने वेधून वेचले  साहित्य रसिक वाचनप्रेमींना  वाचन साखळीत वाचायला दिले|| वाचलेल्या आवडीच्या पुस्तकाबद्दल  व्यक्त होण्याची संधी मिळते  वैचारिक विचार वैभवाने  ज्ञान माहितीची कक्षा रुंदावते || पुस्तकांशी मैत्री दृढ करुया  दिसामाजी वाचन लेखन करुया वाचन साखळी अखंडित ठेवूया  वाचनसंस्कृतीला हातभार लावूया || दर्जेदार प्रसिद्ध साहित्यकृती वाचूया  वाचनाने शब्दभंडार प्रगल्भ करुया आपल्या भाषेत व्यक्त होवूया  लेखन अभिरुची विकसित करुया || साहित्यकलेचे अवघे भांडार वाचायला मिळती नानाविध प्रकार  वाचनाने विचारांना चालना मिळते  वाचन साखळी वेचक शोधते|...

जलाशयाची प्रतिमा काव्य पुष्प-१५९

Image
❄️जलाशयातील प्रतिमा ❄️ अथांग जलाशय धरणाचा संथ वाहणाऱ्या कृष्णेचा  भास्कराच्या प्रतिमेचा  चमचमणाऱ्या ताऱ्यांचा || तरंगावर दिसे दिवसा चांदण्या  जलदीप प्रकटले दिवाळीच्या स्वागता नक्षी,रांगोळी ताऱ्यांची उपमा अकल्पित दृश्याने सुचली कविता || नजरती केटस् पाॅईंट दूरवर  विलक्षणी डोंगर महाबळेश्वर अर्धचंद्राकृती टेकडाचा आकार  फुलदाण्यांचे झुबके हिरवेगार|| जलतरंगावरची वलये विरती काठावरती  निसर्गाच्या सहवासाने  ताणतणाव धूसरती || अथांग जलाशय मनाला भुरळतो  पाण्यात उतरायला मोहित करतो   क्षणभर तनमनाला आल्हाद देतो पोहणं भाकऱ्या खेळणं स्मरतो|| श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प-१५९ यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. click on  https://raviprema.blogspot.com

लालपरी एस.टी.काव्य पुष्प-१५८

Image
लालपरी(एस. टी.बस) २ जून वर्धापनदिन  आम जनतेचा जनरथ कडे कपारी बस धावती  नोकरदारांचा दैनिक पथ  वाडीवस्तीवर बस पोचती  | मुलांच्या शिक्षणासाठी  मोफत सवलतीचा पास  मुलांचं शिकणं घडण्याला  प्रवासाचा रोजचा  सहवास | रस्ता तिथं लालपरीचा खेडोपाडी चौफेर प्रवास रातराणी ,जनतागाडी   सामान्यांची गाडी खास | डाकगाडी दर्शनगाडी पार्सलगाडी शिवनेरीत शिवशाही प्रवास  लाल रंगछटेच्या गाडीतला  मनात रुंजतो कॉलेजचा प्रवास| एशियाड निमआराम सुपरगाडीचा                विनाथांबा आरामात प्रवास  सवलतीच्या सुखसोयीचा  मिळे गरजूंना सहवास | शासकिय लाभार्थ्यांना  सवलतीचा एस.टी.पास  यात्राउत्सवाच्या काळात एस टी चाच प्रवास खास  | प्रासंगिक कराराने सहल घडती  लालपरीत बसून गप्पांची मैफल रंगती  घाटाच्या वळणावळणाने धावती  निसर्गसौंदर्याची दृश्ये बघत प्रवासती| श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प-१५८

ऐसै जीवन गाणे काव्य पुष्प-१५७

Image
🍁ऐसै जीवन गाणे  ऐसै जीवन गाणे  जीवनवाटेतले  टिपलेले  वेचक वेधक क्षण पाहूया  आयुष्यातील आठवणी  सुपात पाखडून घेऊया|| संघर्षाचे कष्टमय धान जात्यात भरडून दळूया  लोकगीतं ओव्या गात   सुखाचे पीठ मिळवूया|| दु:खाच्या पेटत्या ढपल्यावर   फुंकणीने फुंकर घालूया  सुखाची चूल पेटवून  समाधानाचा सैपाक रांधूया || निराशा अपयश ताणतणाव पाटया वरवंट्याखाली वाटूया  यश किर्तीच्या चवीची  मसाला चटणी बनवूया || ध्येयाच्या थंडगार दुधाला  चिकाटीचे विरजण लावूया  जिद्दीचे दही रवीने घुसळून  प्रगतीचे लोणी काढूया|• श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प-१५७ यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https://raviprema.blogspot.com

उजळले घाट काव्य पुष्प-१५६

Image
💥🪔उजळले घाट🏮  त्रिपुरारी पौर्णिमेला    घाट उजाळला   दिव्यांच्या प्रकाशाने  परिसर उजळून गेला || वाईतल्या घाटांवरी  पणत्यांची रोषणाई  गणपती मंदिराची  आरास दिसे नवलाई|| बांधली तोरणे  विद्युत रोषणाईची  जलात पडली प्रतिमा  रंगीबेरंगी  दीपांची|| आठवण येते मनोमनी दिवाळीच्या दीपोत्सवाची  चंद्राच्या शीतल प्रकाशात  रुप खुलून दिसती घाटाचे || दिव्यांच्या ठिपक्यांची नक्षी  पहायला जनसागर लोटती  पणत्यांच्या सजावटीने  घाटांचं रुप प्रकाशती|| काव्य पुष्प-१५६ श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई फोटो साभार फेसबुक

शीतल सांज काव्य पुष्प-१५५

Image
*शीतल सांज* शांत सायंकाळी विलोभनीय बिंब दिवाकराचे रुप नजर वेधते   ढगांना गुलालाची लाली  आकाशी उजळून दिसते || रवि किरणांचा तेजोमय प्रकाश  लाल सोनेरी रंग उधळतो  मनमोहक सूर्यास्ताचा देखावा क्षणात नयनाने टिपतो || डोंगरमाथ्यावरुनी दिसे  मोहक रुप अस्ताचं  क्षितीजावरील निळसर छटेत धूसर होत असल्याचं|| हे प्रभाकरा तुला नमितो  तेजोमय चेतनेची वाट पहातो  तुझ्या सौंदर्यासह पवनचक्की अन् झाडवेलींचे दृश्य टिपतो|| काव्य पुष्प-१५५ श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https://raviprema.blogspot.com