
आकसलेला पाऊस
पाऊस आता चांगला आकसला
अन् ओढ लावून झाला पशार
माना टाकल्या पेरलेल्या पिकांनी
गवताची रोपं झाली पिवळीशार ||
विधात्या घेऊन ये लवकर
काजळी काळेभोर मेघ
पाड तहानलेल्या धरतीवर
रिमझिम पावसाची रेघ ||
कडक उन्हाच्या काहिलीने
बदलले कोवळ्या पिकांचे रंग
दुबार पेरणीच्या परवडीने
शेतकऱ्यांचा होईल बेरंग ||
हे वरुणराजा तूझे मेघ कुठं दडले
वाट बघत राहिले आभाळाकडे डोळे
घाल थेंबाचे रिंगण ही विनवणी तुले
मनसोक्त साजरे कर नक्षत्राचे सोहळे||
तृष्णा भागेल भेगाळलेल्या जमिनीची
क्षुधाशांती तृप्त होईल रानशिवाराची
मिळेल पिकांना संजिवनी अमृताची
मग जोमाने वाढ होईल रोपांची ||
श्री रवींद्रकुमार लटिंगे
दि ५ जुलै २०२१
अभिप्राय
[7/7, 10:02 AM] dr ashok patil:
आकसला गेला पाऊस अत्यंत सुंदर व कवी मनाच्या दर्शनाने माझंही मन तेवढेच पावसाकडे वाट बघत आहे खूप सुंदर विनवणी पावसाला केलेली आहे कविता करावं तेवढं कौतुक कमीच आहे छान छान कविता अभिनंदन सर . लटिंगे सरांची दृष्टी आणि लेखणी या दोन्हीही श्रेष्ठ दर्जाचे आहेत सलाम करतो मी सरांना
[7/7, 10:05 AM] dr ashok patil:
आकसलेला पाऊस कविता अत्यंत उत्तम दर्जाची आहे लेखकाची दृष्टी आणि लेखणी दोन्ही अभिनंदनास पात्र आहेत धन्यवाद सर. डॉक्टर अशोक पाटील सातारा
[7/7, 10:07 AM] mahadev bhokare sir: *धाडले निरोप मी पावसास गोठल्या*
*परी मेघांच्या पखाली मोकळ्याच चालल्या!*
[7/7, 9:21 AM] +91 97653 92882: छाया जावळे वाई
अतिशय हृदयस्पर्शी आर्त साद वरूणराजाला...
[7/7, 10:00 AM] santosh dhebe:
बळी राजाची व्यथा आणि पर्जन्य राजाला आर्जव सुंदर शब्दातला काव्य साज दादा.
धन्यवाद मिञहो
ReplyDelete