काव्य पुष्प-२३३ मातीतले खेळ
खेळूया गोट्या
गावाकडचा खेळ मजेमजेचा
बालपणीच्या सुख आनंदाचा
काचेच्या गोट्या नापानापीचा
नाहीतर हडकीने तानापाणीचा
रिंगणात डाव मांडला
हंटरने मग नेम धरला
गोटीला ताड्या मारला
मग अचूक नेम बसला
मांडला डाव खेळाचा
काची अथवा हडकीचा
नजरेने गोटी टिपायचा
अख्खी ढाय जिंकायचा
नाहीतर गलीत कचायचे
पगा दुगा तिगा ठरवायचे
गुढघ्याची घोडी करायचे
नेम धरून गोटीला टिपायचे
गडी वाटून डाव खेळायचं
लांबवर पिंगवत नेहायचं
हुकले की गलिकडं जायचं
मूठ किंवा ढोपराने खुरटायचं
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
खेळण्याची फार मजाच बालपणी
खेळण्यापायी घरच्यांची बोलणी
तरी पुन्हा डाव पडायचा मैदानी
श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
दि.९ जुलै २०२१
Comments
Post a Comment