काव्य पुष्प- २३९ कोसळधारा







  कोसळधारा


घोंगावत्या वेगवान वाऱ्याने

काजळी ढग बेसुमार फुटले  

आकसलेल्या आषाढ मेघाने 

धोधाट्याने तुफान झोडपले 


थुई थुई रिमझिम पाऊसधार

मुसळधार कोसळधार झाली

फुटले बांध पाण्याच्या ओझ्यानं

शेती माती ताली वाहून गेली


धुवाॅंधार पावसाने चौफेर 

फटकेबाजी सुरू केली

नदीनाली दुथडी भरून 

ओसंडून वाहू लागली 


नदीकाठची गावं झाली जलमय  

ऊखडले रस्ते घरांच्या पडझडी

संततधारेने  दळणवळण ठप्प 

पडली झाडं कोसळल्या दरडी


दिनांक २२ जुलै२०२१


Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड