काव्य पुष्प-२३७ गुरुपौर्णिमा
गुरुने दिला ज्ञानरुपी वसा,आम्ही चालवू हा पुढे वारसा....
सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरुपौर्णिमा
आयुष्याच्या वळणावर
ज्यांनी आम्हा ज्ञान दिले
मनाच्या सद्चिंतनासाठी
सद्गुणांचे विचार पेरले...
विश्वास अन् उमेदीनं
आकांक्षांना बळ दिलं
पाठीवरती थाप टाकून
आम्हां लढायला शिकवलं ....
अनुभवाची शिदोरी देवून
कलाविष्काराची संधी दिली
विश्वासाने आत्मप्रेरणा देवून
नवनिर्मितीची प्रशंसा केली....
निसर्ग, मातापिता, ग्रंथ हेच गुरु
सखा,वेळ अन् कामच महागुरु
हेची आपले पथदर्शक सदगुरु
तयाला मनोभावे वंदन करु....
श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे वाई
दिनांक २२ जुलै२०२१
Comments
Post a Comment