रविंद्रकुमार गणपत लटिंगे प्राथमिक शिक्षक
ओझर्डे ता.वाई जि.सातारा
शालेय उपक्रम
माझी भटकंती
पुस्तक परिचय
माझी ज्ञानमंदिरे
प्रश्नपेढी
सामान्य ज्ञान
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा 🌸माझा गाव🌸 आमच्या गावची यात्रा ➖〰️➖〰️➖〰️➖〰️ लोकनाट्य तमाशा ग्रामीण भागातील लोकांचे मनोरंजनाबरोबरच प्रबोधन तमाशा कलाकार करीत.. आमच्या गावात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध तमाशा मंडळांनी सादर केले आहेत.दत्ता महाडिक,अमन तांबे, सरस्वतीबाई कोल्हापूरकर,मंगला बनसोडे, रघुवीर खेडकर,साहेबराव नांदवळकर, भिकाभीमा व इतर अनेककांचे तमाशे झाले आहेत... यात्रेच्या मुख्य दिवशी सकाळी नवीन कपडे घालून देवळाकडील दुकाने बघायला जायचं. खुशखबर खुशखबर , ओझर्डे गावच्या तमाशा रसिकांना इनंती करण्यात येते की थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होतय...सर्वांनी लवकर या असा आवाज ऐकू आलाकी धावतपळत तमाशा बघायला देवळाकडे जायचे....सगळ्यात पुढे बसायचं गणाने तमाशाला सुरुवात.(गण म्हणजे गणेश वंदना),हलगी व ढोलकीची जुगलबंदी साथीला क्लोरोनेटची धून ,मग गवळण ,फार्सिकल, संगीतबारी आणि वगनाट्य असा कार्यक्रम चालायचा तमाशातील फार्सिकल( ...
🌸 ओझर्डे गावची वैभवशाली छत्रदायिनी श्री. पद्मावती देवी.. ग्रामदैवत श्री पद्मावती देवी ओझर्डे निवासिनी श्री पद्मावती माता ➖❄️➖❄️➖❄️➖❄️ ओझर्डे गावचे ग्रामदैवत श्री पद्मावती देवीचे मंदिर वाईहून गावात पुल ओलांडताच लक्ष वेधून घेते. देवीचे मंदिर चंद्रभागा ओढ्याच्या काठावर आहे.गावात प्रवेश करतानाच मंदिर लागते. चारही बाजूने भक्कम तटबंदी आहे.तटबंदीला पवळी म्हणतात. पुर्वेस तोडीच्या दगडात बांधलेले उंच प्रवेशद्वार असून त्यावर नगारखाना आहे.त्यामुळे प्रवेशद्वार भारदस्त आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर दोन्हीकडे निवांत थंडावा देणारी ढेलजा आहे. उजवीकडे नगारखान्यावर जायला तोडीच्या दगडी पायऱ्या आहेत.पायऱ्या उतरुन खाली गेल्यावर समोरच तुळशीवृंदावन दिसते.मंदिराचा मुख्य भाग हेमाडपंथी असून दगडी बांधकाम आहे. सभामंडप व गाभारा आहे.गाभाऱ्यात चांदीची मेघडंबरीवर सुबक नक्षीकाम केलेले आहे. सभामंडपात पालखी व झुंबर आहे.सभामंडपातून बाहेर जायला दोन्हीकडे छोटे दरवाजेआहेत.मंदिरात डावीकडे दीपमाळा आहे.तेथील मोकळ्या आवारात गावचा हरिनाम सप्त...
गावाकडच्या आठवणी यात्रेतील कुस्त्यांचा फड बालपणीच्या साठवणीतल्या आठवणी.... 🌸माझा गाव🌸 क्रमशः गावची यात्रा ♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️ कुस्त्यांचा फड (मैदान) 🤼♂️🤼♀️🤼♂️🤼♀️🤼♂️🤼♀️🤼♂️🤼♀️🤼♂️ महाराष्ट्राच्या मातीतल्या लोकप्रिय रांगडा व मर्दानी खेळ,मनगटातील रग,मनातला डाव -प्रतिडाव आणि मेंदुने कौशल्याचा वापर करीत खेळला जाणारा क्रिडा प्रकार.चपळता, अचूकता व निर्णयक्षमता असणारा कुस्तीचा श्वास गावोगावच्या पहिलवानांना यात्रेनिमित्त फडात कुस्त्या खेळण्याची नामीसंधी तर शौकिनांना पहाण्याची संधी.. मैैैैदानात नारळ फुुुुुटल्यापासून ते चांंगभलं होईपर्यंत उभं राहून नाहीतर पुढं बसून कुस्त्यांचा आनंंद लुुुुुटायचो. श्री पद्मावती देवीच्या देवळात शिंग फुंकून, हलगीताशा ,झांज वाजवत पुलाजवळच्या शेतात तयार केलेल्या आखाड्यात यात्रा कमिटी ,गावकरी, पहिलवान , यात्रेकरू आणि हौशी कुस्ती शौकीन जमत.पुलाकडील शेतात कुस्तीसाठी मैदान तयार केलेलं असायचं.वावार फणूून फड तयार केले...
Comments
Post a Comment