काव्य पुष्प -२३० आकसलेला पाऊस





     आकसलेला पाऊस 

पाऊस आता चांगला आकसला

अन् ओढ लावून झाला पशार 

माना टाकल्या पेरलेल्या पिकांनी 

गवताची रोपं झाली पिवळीशार ||


विधात्या घेऊन ये लवकर 

काजळी काळेभोर मेघ 

पाड तहानलेल्या धरतीवर

रिमझिम  पावसाची रेघ ||


कडक उन्हाच्या काहिलीने 

बदलले कोवळ्या पिकांचे रंग

दुबार पेरणीच्या परवडीने   

शेतकऱ्यांचा होईल बेरंग ||


हे वरुणराजा तूझे मेघ कुठं दडले  

वाट बघत राहिले आभाळाकडे डोळे

घाल थेंबाचे रिंगण ही विनवणी तुले

मनसोक्त साजरे कर नक्षत्राचे सोहळे||


तृष्णा भागेल भेगाळलेल्या जमिनीची 

क्षुधाशांती तृप्त होईल रानशिवाराची 

मिळेल पिकांना संजिवनी अमृताची 

मग जोमाने वाढ होईल रोपांची ||  



श्री रवींद्रकुमार लटिंगे 

दि ५ जुलै २०२१

अभिप्राय


[7/7, 10:02 AM] dr ashok patil: 
आकसला गेला पाऊस अत्यंत सुंदर व कवी मनाच्या दर्शनाने माझंही मन तेवढेच पावसाकडे वाट बघत आहे खूप सुंदर विनवणी पावसाला केलेली आहे कविता करावं तेवढं कौतुक कमीच आहे छान छान कविता अभिनंदन सर . लटिंगे सरांची दृष्टी आणि लेखणी या दोन्हीही श्रेष्ठ दर्जाचे आहेत सलाम करतो मी सरांना
[7/7, 10:05 AM] dr ashok patil: 
आकसलेला पाऊस कविता अत्यंत उत्तम दर्जाची आहे लेखकाची दृष्टी आणि लेखणी दोन्ही अभिनंदनास पात्र आहेत धन्यवाद सर.  डॉक्टर अशोक पाटील सातारा

[7/7, 10:07 AM] mahadev bhokare sir: *धाडले निरोप मी पावसास गोठल्या*
*परी मेघांच्या पखाली मोकळ्याच चालल्या!*

[7/7, 9:21 AM] +91 97653 92882: छाया जावळे वाई 
अतिशय हृदयस्पर्शी आर्त साद वरूणराजाला...
[7/7, 10:00 AM] santosh dhebe:

 बळी राजाची व्यथा आणि पर्जन्य राजाला आर्जव सुंदर शब्दातला काव्य साज दादा.






Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड