अतिवृष्टीने मन भयभीत झालं काव्य पुष्प २३८
अतिवृष्टीने मन भयभीत झालं
पावसाच्या आक्रंदाने
मन भयभीत झाले
सैरावैरा पाण्याचे लोंढे
पायथ्याला भिडले |
जीवनच भुईसपाट केले
घरे जनावरं उध्दवस्त झाले
काळाने झडप घातली
संसार उघड्यावर पडले|
अतिवृष्टीने पायथ्याच्या वस्त्या
दरडीखाली गडप झाल्या
सगळीकडे हाहाकार उडाला
आसवांच्या आक्रोशधारा झाल्या |
शेतीभाती वाहून गेली
सुन्न मनं बेचिराख घरं
कालचा धुवांधार पाऊसाने
काळजाला पडले चरं|
पावसाचा हवाहवासा चेहरामोहरा
आता नकोसा वाटू लागला
धुवाॅंधार आकांडतांडव करून
हृदयाला मात्र तीव्र चटका दिला|
हे विधात्या पाऊसराजा
आता रणकंदन थांबव
रौद्ररूपातील विदारक खेळ
आता तरी थांबव|
Comments
Post a Comment