काव्य पुष्प-२३२ विटी-दांडू





      विटी-दांडू 



खेळ हा मजेशीर मातीतला 

रिंगण गलीत या खेळायला

ओलीसुकीने डाव सुरू झाला 

रिंगणातून दांडूने विट्टी कोला|


विट्टी झेलण्या टपले खेळाडू 

चिअर अप देती सगळेच भिडू 

खेळ उधळायला लागले नडू 

वादाचे कोलाहल लागले झडू |


घेता घेता विट्टीचा झेल सुटला 

एकबल होता डबल झाला 

मग विट्टीला टोला लगावला

विट्टीच्या मापाचा स्कोर झाला|


दुसऱ्या भिडूने विट्टी कोलली

धावत पळत जावून ती झेलली

त्याची मग गलक्याने हुर्यो केली 

गटाची एक खेळी संपत आली|


प्रतिस्पर्ध्यांचा डाव सुरू झाला 

विट्टी कोलता दांडू निसटला 

मग दुसऱ्याने टोला हाणला 

झेल टिपताना पाय घसरला |


 विट्टीला दांडूने थोडं उसळवले 

डबल करता करता टिबल झाले

मग विट्टीला हवेत टोलवले 

चपळाईने झेलबाद केले|


असाच खेळ राहिला रंगत

चिडाचिडीत होती झगडे 

मध्यंतरी बसते खाऊची पंगत 

भांडणं विसरण्याचे देती धडे |


श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई 

९ जुलै २०२१ 







Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड