रविंद्रकुमार गणपत लटिंगे प्राथमिक शिक्षक
ओझर्डे ता.वाई जि.सातारा
शालेय उपक्रम
माझी भटकंती
पुस्तक परिचय
माझी ज्ञानमंदिरे
प्रश्नपेढी
सामान्य ज्ञान
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
ग्रामीण भागातील कुमारी वैष्णवी सुजाता विजय ढोकळेची यशाची बिरुदमाला — पहिल्याच प्रयत्नात ‘राजपत्रित अधिकारी’ पदावर निवड.... परिश्रम, सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर कुमारी वैष्णवी विजय ढोकळे यांनी महाराष्ट्र राज्य सेवा स्पर्धा परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यशाची सुवर्णकीर्ती मिळवत सहाय्यक राज्यकर आयुक्त वर्ग -१ या पदी नियुक्ती झाली. त्यांच्या या अभिमानास्पद यशामुळे ओझर्डे परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. वैष्णवीचे प्राथमिक शिक्षण ओझर्डे ता.वाई येथील जिल्हा परिषदेचे प्राथमिक शाळेत झाले असून दहावीपर्यंतचे शिक्षण पतितपावन विद्यामंदिर,ओझर्डे येथे पूर्ण केले.प्राथमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतही ती जिल्हा गुणवत्ता यादीत झळकली होती. पुढील इयत्ता ११ वी व १२ वीचे शिक्षण कलासागर अकॅडमी वाई येथे घेतले तर उच्च शिक्षणातील पदवी तिने सांगली येथील नामांकित वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात बी.टेक (कंप्युटर सायन्स) मध्ये पदवी प्राप्त केली. घरची आर्थिक परिस्थिती सामान्य असतानाही वडील एस.टी. डेपो वाई येथे मेकॅनिक म्हणून काम करत अ...
आनंदाची शाळा गावाचा अभिमान आमचा अभिमान सातारा जिल्हा परिषदेची शाळा आनंदी वातावरणात आनंद पेरणारी सातारा जिल्हा परिषदेची शाळा |१| ज्ञान विज्ञान कला आणि क्रीडा कृतियुक्त शिक्षणाचा फुलवूया मळा सातारा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकायला बाळांना लावूया लळा|२| सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी केंद्र ते जिल्हास्तरीय विविध स्पर्धा कलाविष्काराला बालआनंद मेळा केंद्र ते जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा |३| अभिव्यक्तीला वाव आनंददायी शनिवारी अभ्यास सहलींतून भटकंतीची वारी विविध स्पर्धा परीक्षांचा पॅटर्न सातारी जिल्हा परिषदेची शाळाच लय भारी |४| अवांतर गोष्टींची पुस्तकं वाचून परिचयाची वाचनउत्सवात संधी बालसाहित्य,ईबुक्स वाचनाच्या आवडीने विद्यार्थी बनतील छंदी |५| शाळेच्या परसबागेत फुलतो भाजीपाल्याचा फळांचा बहार शारीरिक तंदुरुस्तीला त्रिस्तरीय सकस स्वादिष्ट पोषण आहार |६| नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्रात कृतीयुक्त अध्ययनअनुभव गुणवत्ता संवर्ध...
व्याजवाडी केंद्र समूहाच्या मुख्याध्यापिका सौ.नलिनी जाधव यांच्या सेवा गौरव समारंभात धान्य व वही तुलादान आणि उपस्थितांचे स्वागत फुलझाडांचे रोपटे देऊन केले.या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक उपस्थितांनी केले. जाधव बाईंचे पिताश्री रघुनाथ कदम,पहिले शिक्षक सहकारी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख श्री.बा.की. गायकवाड, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका गायकवाड मॅडम,सेवानिवृत्त केंद्रप्रमुख सौ. विजया कांबळे , सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी सौ.नकुसा देशमुख मॅडम, श्रीमती रोहिणी निकम मॅडम, श्री विलास पोळ आणि पती श्रीमान भानुदास जाधव यांच्या शुभहस्ते सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन करून झाला.यावेळी सुपुत्र श्री.रोहीत आणि संकेत, सूना मीनल व सौजन्या आणि नातवंडे यांच्या शुभहस्ते जाधवबाईंची धान्य,गुळ आणि वही तुला केली. श्री बाबूराव गायकवाड,श्री प्रदीप फरांदे, श्री नारायण शिंदे,सौ.शारदा शिंदे सौ.मुक्ता शिंदे,सौ ज्योती नेमाडे,सौ.ललिता गायकवाड मॅडम आणि स्नुषा सौ मीनल जाधव यांनी गौरवपर मनोगते व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. तदनंतर वाई तालुका शिक्षक मित्र परिवाराच्या वतीने शैक्षणिक कार्याच्या गौरवार्थ ‘मानपत्र’ देऊन...
खरं आहे...दडी मारलेल्या पावसाने लवकर यावे...भरभरून बरसावे.
ReplyDeleteआतुरता आगमनाची
ReplyDeleteमुसळधार वर्षावाची
धन्यवाद सर
ReplyDelete