४९| पुस्तक परिचय, दैनंदिन पर्यावरण

📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚 ४९|पुस्तक परिचय दैनंदिन पर्यावरण लेखक-दिलीप कुलकर्णी 🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾 पर्यावरणाच्या समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करीत आहेत.त्यामुळे उद् भवणाऱ्या समस्यांनी माणसं व्यथित होतात.भययुक्त परिस्थिती निर्माण होते.रोज कानांवर येणाऱ्या अथवा वाचायला, पाहायला लागणाऱ्या या समस्यांवर आपण खारीचा वाटा उचलावा असे प्रत्येकाला वाटत असते.पण 'काहीतरी'नेमके काय हे उमजत नाही.हे सांगणारं लेखक दिलीप कुलकर्णी यांचे 'दैनंदिन पर्यावरण'हे पुस्तक आहे.पर्यावरणाच्या पार्श्र्वभूमीवर काहीतरी उपाय चिंतन या पुस्तकात मांडले आहेत. रोजच्या जगण्यात कमीतकमी साधनांचा वापर करताना ऊर्जा संवर्धन करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. वाळलेल्या लाकडांचा वापर करून त्यांच्या घरी स्वयंपाक केला जातो. रेडिओचा अपवाद वगळता स्वयंपाकाचा गॅस इत्यादी आधुनिक साधने ते वापरत नाहीत. त्यांच्या स्वतःच्या मालकीचे वाहनसुद्धा नाही. लेखक दिलीप कुलकर्णी हे विविध सामाजिक विषयांवर व्याख्याने देणे...