नयनमनोहर नदीचं दृश्य -२१०
सृष्टीचे सौंदर्य
नयनमनोहर दृश्य
सुखद गारवा देणारं निसर्गाचेपात्र
टिपलं उध्दव छायाचित्रकाराने
मनमोहक वळणदार सरितापात्र
रंगभरण केलं अद्भुत निसर्गाने |
गोलाकार टेकडी रांगेच्या समोरी
सोनपोपटी रजई पसरली काठावरी
आनंदीआनंद उत्कटती मनमंजिरी
कधी घडेल पहाया भटकंतीची वारी |
नितळ शांत पारदर्शी निळसर पाणी
हिरव्यागार झाडोऱ्याच्या वनरानी
वाऱ्याची भिरभिर अन् पाखरांची गाणी
वाचूया सह्याद्रीच्या नवलाईची कहाणी |
मनसोक्त पाऊलवाटेने भ्रमंतीला
सह्याद्रीच्या डोंगररांगा साद घाली
विरंगुळा लाभतो मनसुखाला
दृश्याने लक्षवेधी किमया साधली|
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
छायाचित्र साभार श्री उद्धव निकम
Comments
Post a Comment