कोकण गोवा भ्रमंती फडकेवाडा फॅमिली रेस्टॉरंट



कोकण गोवा निसर्ग भ्रमंती ,खाद्यसंस्कृती 
खवय्येगिरी फडकेवाडा फॅमिली रेस्टॉरंट
दिनांक ६ मार्च २०२१ 
क्रमशः भाग-२ 

फडकेवाडा नावाचा बोर्ड कधी दिसतोय तो बघत होतो .खरोखरच नावाप्रमाणेच वाडा संस्कृतीला शोभेल अशी पारंपारिकता जपत नव्या विद्युत रोषणाईत खवय्यांचे स्वागत करत होता.फडकेवाडा फॅमिली रेस्टारंट आजरा -आंबोली - सावंतवाडी रस्त्याला आजऱ्याच्या पुढं वेळवट्टी येथे आहे. गावातील मान्यवर पाटलांचा वाडाच शोभावा असं रेस्टारंट आहे.वाडयाचे कौलारु छत,सागवानी तुळया व खांब फर्निचर ,माफक आणि आकर्षक रंगसंगतीने नटविला आहे. पुरातन 'अॅटिक पीसने ' सजावट वाड्याची शोभा वाढविते .काउंटरवर जुन्या काळाची आठवण करून देणारा नंबर डायल करून लावायचा  टेलिफोन, जवळच्या खिडकीत जुन्या स्टोव्हवर पितळेची चहाची किटली,खुंटीवर कंदील,लाईटची खटक्याची काळी बटणं,खांबाला लटकविलेले रोमण अंकातलं वेगळ्याच धाटणीचे घड्याळ, एकंदर सुंदरच शोभिवंत लूक दिलेले हॉटेल होतं.मालवणी आणि कोल्हापूरी पदार्थांची अस्सल चवीच्या पदार्थाची कोल्हीपूरी मटण थाळी आणि राईसप्लेट शाकाहारी ऑडर केली.
तोपर्यंत वाडयाचे रुप बारकाईने बघत होतो.मस्तपैकी सर्व्ह केलेल्या भोजन  आस्वादायला सुरूवात केली.तांबडया पांढऱ्या रस्त्यांची चव लाजवाब होती.सुक्क मटणही चवदार होतं.. चुलीवरची गरमागरम भाकरी कुस्करून खाल्ली. यथेच्छ ताव मारला.छानच आज मेजवानी चाखायला मिळाली.
तदनंतर मुखशुद्धीला थंडगार मघई मसाला पान चघळत खात बाहेर पडलो.
       मुक्कामाचे ठिकाणही मोबाईलवरून निश्चित केले.आंबोली घाट उतारुन सावंतवाडीच्या अलिकडच्या खेड्यात स्नेहदर्शन निवास इथं मुक्काम करणार होतो. आम्ही जेवणानंतर आंबोली सावंतवाडीच्या रस्त्याला लागलो.रात्रीचे साधारणपणे साडेनऊ वाजले होते.दीडएक तासाने मुक्कामी येतोय असं मॅनेजरला सांगितले.सगळीकडे अंधार होता.या अंधारात थंड हवेचे आंबोली घाटमाथ्यावरील  घाट उतरत होतो.मनात शंकाकुशंका येतच होत्या.
निवासस्थान सापडेल का नाही, जंगलातल्या वाटेत तर नसेल ना, एखादं जंगली श्वापद अचानक रस्त्यावर आलं तर , पेमेंट  नकेल्याने बुकिंग फुल्ल तर झाले नसेल ना,त्यामुळे धास्ती वाटत होती.बरं घाटातून चढ-उतार करणारी वाहने माल वाहतुकीचीच जास्त दिसत होती.आपल्या सारखं जागोजागी होणारं गावांचं दर्शनही कमीच होतं ,तुरळकच गावं होती.
प्रवासी वाहनं तुरळकच दिसत होती.खिडकीतून थंडगार वारा अंगावर येत होता.आल्हादपणा वाटत होता.गुगलमॅपला निवासाचे ठिकाण सेट केले होते.त्यामुळं आगाऊ सूचना कळत होती.लेफ्ट का राईट किती किमीवर घ्यायचा ,सरळ किती किमी गाडी चालवायची इत्यादी सूचना कळल्याने दक्षतेने गाडी ड्रायव्हिंग करत होता.सीमेच्या चौकीवर दोन-तीन ठिकाणी पोलिस मालगाड्यांची तपासणी करताना नजरेला पडले.याच घाटमार्गाने उजेडी प्रवासात घनदाट जंगलातील वृक्षराजी पहायला मिळण्याचा आनंद वेगळाच असतो. दोन तासांनी आम्ही निवासाच्या ठिकाणापासून काही अंतरावर होतो.आम्ही गुगलमॅपने थांबविले म्हणून संपर्क केला असता,गाडी जिथं थांबली होती ,त्याच्या डावीकडेच स्नेह दर्शन निवास,साईनगर,कोलगांव,कुडाळ-बेळगांव रोड, सावंतवाडी असा फलक नजरेला पडला.खालील बाजूला दिशादर्शक बाणही डावीकडे जाणारा होता.मग आम्ही डावीकडे गाडीवळवून दोनशे मीटरवरील निवासाकडे पोहोचलो.साईनगर नावाच्या वस्तीच्या शेवटाला निवासस्थान होतं.दुमजली इमारतीतील रुमकडे साहित्य घेऊन निघालो.काही वेळातच निद्रादेवीच्या अधीन झालो.शुभरात्री…

क्रमशः भाग क्रमांक-२
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
यापूर्वीच्या कविता आणि लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://ravipreama.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड