शेतातला माळा काव्य-२०९
शेतातला माळा
शेतातल्या पिकांच्या राखणीला
तात्पुरता मेढीवर उभारलाय माळा
माकडं वानरांना पिटाळून लावायला
शिडीनं वर चढून टेहळणीला ||
सभोवती घनदाट वनराई
डोंगर पठाराच्या माथ्यावरी
पिक घेतलयं गव्हाचं भारी
राखोळीला माळा उंचावरी ||
भितीची तमा नबाळगता
काळोखात जागता पहारा
चाहूल लागताच द्यावा हाकारा
जनावराला हुसकावायला सारा||
बदलते हवामान अन् जनावरांची भिती
मुलांसारखी घेतली पिकांची काळजी
अपार कष्टानी शेतीची मशागती
तवा हातात पडते भाकरी भाजी ||
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
Comments
Post a Comment