माझं दैवत काव्य पुष्प २०८










🥀माझं दैवत🥀
(आई वडील)

काबाडकष्ट करून 
आम्हाला वाढवलं
शेतात घाम गाळून 
आम्हाला  घडवलं ||

आमचे बालहट्ट 
स्वता:चे मन मारुन पुरवले
स्वत: मेहनत करून 
आम्हाला संस्कारीत केले ||

कष्टानं जगण्याची 
शिकवण दिली 
खऱ्यानं वागण्याची 
सवय लावली ||

समाधानी वृत्ती 
विकसित केली
निस्वार्थी सेवेची 
उर्मी निर्माण केली ||

मायेचा आधार
कष्टाची भाकर 
जीवनाचे सार 
मांगल्याचे घर ||

आमची सावली
कृपाळू माऊली 
आजारपणात धावली 
आण्णा-आई माऊली||

तुमच्या मायेची ऊब 
आम्हाला सतत लाभली 
तुमच्या आधाराची सावली 
आम्हाला सदैव मिळाली||

आमच्या झोळीत पडलं 
इतरांना सहकार्याचे दान 
आम्हाला सुसंस्कारित केलं 
याचा आहे अभिमान||

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-२०८

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड