धुकं काव्य पुष्प-२११
धुकं
धुक्यात हरवली वाट
ती शोधायला लागलो
पुढं पुढं शोधता वाट
मीच धुक्यात हरवलो ||
धुक्याच्या दुलईत सजले
हिरवं रुपडे निसर्गसृष्टीचे
मेघस्तरात सूर्यकिरण लपले
रुप देखणं जरीच्या पदराचे||
झाडं वेली धूसर दिसती
फुलं पाखरे न्हाऊन निघती
डोंगर रानं दवबिंदूत भिजती
अनोखे रुप धारण करती ||
धुके दाटले आठवत आले
लख्ख किरणांनी दव विरले
तेजोमय ऊर्जेने मन चेतविले
मनातल्या धुक्याला धूसरविले||
काव्य पुष्प-२११
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
Comments
Post a Comment