कोकण गोवा भ्रमंती फोंडा ते रेडी प्रवास





कोकण गोवा निसर्ग भ्रमंती , खाद्यसंस्कृती 
    प्रवास वर्णन  फोंडा ते  रेडी ता.वेंगुर्ला पर्यटन 
दिनांक ८ मार्च २०२१
क्रमशः भाग-६
    खानपान उरकून दहाच्या सुमारास आम्ही भटकंतीला बाहेर पडलो.आल्या मार्गानेच म्हापश्यापर्यंत हायवेने जायचे होतं.यापूर्वी अनेकदा गोव्यातील निसर्ग सौंदर्य आणि मौज मजेचा आनंद द्विगुणित केलाआहे.तसेचयापूर्वीच्या भटकंतीचे सदर लेखन केले आहे.प्रवासात असतानाच समुद्र किनाऱ्यावरील कोस्टल मार्गाने भटकंती करण्याचा मनोनिग्रह केला होता.नेहमी आपण परिचित भागातील ब्रॅण्डेड डेस्टिनेशन निवडतो.यावेळी मात्र गोंगाटापासून दूर आणि विरळगर्दीच्या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकाठच्या वेंगुर्ला ,मालवण आणि देवगड पर्यत जाण्याचा मनसुबा ड्रायव्हरला सांगितला.म्हापसा आल्यावर डावीकडे वळून छोटेखानी दूपदरी रस्त्याने गुगल मॅपला वाटाड्या करुन गोव्याच्या मी प्रवास न केलेल्या चकाचक रस्त्याने मार्गक्रमण करत होतो.
तिकडच्या रस्त्यावर अचानक गायी दत्त म्हणून उभ्याठाकतात.हाॅर्न वाजविला तरी पटकन बाजूला सरत नाहीत.त्यामुळं जैसेथे थांबावंलागतं.
अथांगसागराचं रुप न्याहाळत,चढउताराचे दळणवळणाचे रस्ते आणि खाड्यांच्या ब्रिजवरुन सागरनदीचं सौंदर्याचे क्षणअचूकपणे वेचत वेधक टिपत आम्ही रेडीला जात होतो.रेडी हे गाव पोंड्यापासून साधारणपणे ७४ किमीवर आहे. अरोंडा,मंद्रेम आणि चोपदम अश्या नावाची गावं नजरेला पडतात.तिथं प्रामुख्याने कोंकणी, इंग्रजी आणि गोवन्स भाषेत दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत.पुढे जाणारे दोन तिनं रस्ते आले तर कोणत्या दिशेने जावं हे सुचत नाही.गुगलही कैकदा फसवितं मग वाटेतल्या लोकांना विचारून किंवा कैकदा हाक मारुन इप्सित ठिकाणचा नेमका रस्ता विचारून घ्यावा लागतो.दोनतीनदा आम्ही खात्री करून पुढं आलो.एका दुकानदाराला विचारताना तर तुम्हाला मराठी समजतं का ?अशी विचारणा केली. होय म्हटल्यावर त्याने आपुलकीने गाडीजवळ येऊन सरळ जावून पुढील चौकात डावीकडे वळा आणि सरळ जावा,बारा किमीवर रेडीचे गणेश मंदिर गावाच्या बाहेर आहे.आणि पेट्रोलपंप पुढं आहे का? विचारल्यावर वाटेतच दहा किमीवर गोव्याच्या हरसन गावात आहे.इतकं अदबीने सांगितले, काकांना मनपुर्वक नमस्कार करून आभार मानले.मग पुढं पेट्रोलपंप बघत बघत निघालो.कारण डिझेलचा दर्शक काटा कमी असल्याचे दाखवत होता.त्यामुळं गाडीचा सारथीही आयड्याची कल्पना वापरून उताराला आउट ऑफ मारत डिझेलची बचत करत होता. चढ उताराच्या रस्त्याच्या दुतर्फा काजूची झाडं दिसत होती. पिकलेल्या काजूची बोंडं लालभडक दिसत होती. लाल ढोबळी मिरचीचा आकारात दिसत होती आणि खाली कठीण कवचात काजूगर.या फळांचं बी बाहेर असतं. बोंडातील रसाचा दर्पही वेगळाच होता.तर कच्चे काजूगरही लगडलेले बघायला मिळत होते.आम्ही गाडी थांबवून एके ठिकाणी मस्तपैकी पिकलेल्या बोंड आणि काजूच्या झाडाची छबी कॅमेऱ्यात कैद केली.
बऱ्याचठिकाणी आमराईही दृष्टीस पडत होत्या.मोहर आणि लगडलेली कैरी दिसत होती.गाव दिसल्यावर दोन्हीकडे पंप दिसतोय का ते आतुरतेने बघत होतो.तदनंतर हरसन अरामबोल येथील पंपावर डिझेल टाकी फुल्ल भरायला चालकाला सांगितले.पुन्हा वाटेत खोळंबा व्हायला नको.तिथल्या इंधन ग्राहकांच्या रांगेवरुन हा दोन्ही राज्याच्या सीमेवरच्या कोस्टल रोडवरील एकमेव असावा असा मनी कयास आला. 
क्रमशः भाग-६
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
यापूर्वीच्या कविता आणि लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://ravipreama.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड