कोकण गोवा भ्रमंती फोंडा




कोकण गोवा निसर्ग भ्रमंती , खाद्यसंस्कृती 
 घावण -उसळ पत्रादेवी ते पोंडा
दिनांक ७ मार्च २०२१
क्रमशः भाग-५
        सावंतवाडी मागे जाऊन आम्ही सोनुर्लीला लेफ्ट टर्न घेऊन मुंबई -गोवा हायवेला आलो. साधारणपणे ९० किमी अंतर काटायचं होतं.चहानाष्टा अजूनही झाला नव्हता.त्यामुळे सुपरिचित हॉटेलजवळ नाष्ट्याला गाडी थांबवायला सांगितली.थोड्या वेळाने डिव्हायडर ओलांडून सावली हॉटेलकडे वळलो.
तदनंतर मेनू बोर्ड वर नजर फिरवली घावण-रस,
घावण-चटणी,घावण उसळ,घावण मिसळ असे मेनू उपलब्ध होते.तिथं कोकणची खासियत असलेला "घावणउसळ" हा मेनू नाष्ट्याला मुलानं मागविला.
मुलाने आवडीने चाखलेल्या "घावण-उसळ" डीशची फर्माईश केली .सहज समोरील भिंतीवर नजर गेली असता,येथे शिरवाळे करून मिळतील असा बोर्ड बघायला मिळाला.त्यावरील चित्रा वरून समजले की आपल्याकडे ज्याला शेवया (बोटवं) संबोधतो त्यास' शिरवाळे'म्हणतात.तांदळाच्या पीठापासून बनविलेले घावण आणि बटाटा वाटाण्याची पातळसर भाजी असा मेनू नाष्ट्याला मिळाला. कोकणची खासियत असलेली डीश फारच चवदार आणि लज्जतदार होती.भाजी कमी तिखटाची आणि गरमगरम घावणं चवीने खात होतो.मस्तपैकी निर्भेळ वेगळा कोकणी अल्पोपहार करायला मिळाला.
तदनंतर चहापाणी घेऊन आम्ही बांदा,पत्रादेवी चेकनाका करत करत म्हापश्यात पोहोचलो.सतरा नंबरच्या हमरस्त्याच्या नवीन कामामुळे रस्ता उरकत होता.म्हापश्यातून दक्षिण आणि उत्तर गोव्याला जोडणारा  कॅपिटल सिटी पणजीच्या बाहेरुन मांडवी नदीवरील केबल स्टे ब्रीज वरुन आणि ओव्हरफ्लाय ब्रीजवरुन पणजीतून मडगाव हायवेलालागलो.
साडेदहाच्या दरम्यान पोंड्याला आमची गाडी बायपासजवळील फर्मागुडीत घरगुती कारणास्तव थांबवली.
  घरातील सगळी कामं उरकून आम्ही दुपारी पोंड्याच्या मध्यवस्तीतील प्युअर शाकाहारी भोजनथाळीचा आस्वाद अंत्रज महल कॅफेत घेतला.तदनंतर घरातील साहित्याची मांडणी केली. तदनंतर सायंकाळी आम्ही मडगाव येथील प्रसिद्ध असलेला कोलवा बीच बघायला निघालो.हा बीच सर्वात लांब असून रुपेरी, वस्त्रगाळ, मऊशार रेती सर्वत्र दिसते.अगदी सायंकाळी कलंगुटसारखी तोबा गर्दी ओसंडून वाहत होती. निसर्गरम्य विरंगुळ्यासाठी अप्रतिम डेस्टिनेशन.रुपेरी वाळूत बैठक मांडून धमाल मस्ती करत ,गप्पागोष्टी करत,हसत खिदळत आणि मौजमजा करत ,मजेमजेचे क्षण कॅमेऱ्यात छबी टिपत सगळे दंग होते.सायंकाळचं लयभारी दृश्य दिसत होतं.वाळूतल्या बाकांवर बसून नजरेसमोरच्या सागरातील लाटांचीमजा बघत आणि नजरे समोरील अथांग सागराची भव्यता मनाला भुरळ पाडते.अमूल ब्रॅण्डच्या बटरस्कॉच कुल्फीचा आस्वाद घेऊन परतीच्या मार्गाने फर्मागुडीला आलो.
 मस्तपैकी घरच्या जेवणाचा पावट्याचं कालवण आणि भाकरीचा आस्वाद घेऊन विश्रांती घेतली.
शुभ रात्री
क्रमशः भाग-५
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
यापूर्वीच्या कविता आणि लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://ravipreama.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड