कोकण गोवा भ्रमंती कुणकेश्वर अमोलचे अनमोल सहकार्य






कोकण गोवा निसर्ग भ्रमंती , खाद्यसंस्कृती 
  देवगड पर्यटन ,अमोलचे अनमोल सहकार्य 
 दिनांक ८ मार्च २०२१
क्रमशः भाग क्रमांक-१४
  मालवण पासून ४४ किमी अंतरावरील देवगड तालुक्यातील कुणकेश्वराकडे आमची गाडी निघाली.माडापोफळीच्या बागेतील झाडांच्या पर्णिका आणि डहाळ्यामधून तेजःपुंज सूर्याचं बिंबाच दृश्य मोहक दिसत होते. साधारणपणे वीसच मिनीटे झाली असतील.
आचरा गावातील सडेवाडीच्या रस्त्याच्या कडेला गाडी चालकाने थांबवली.गाडीतून बाहूर येऊन त्याने बॉनेट उघडले आणि इंजिन बघू लागला.मी ही खाली उतरून काय झालं म्हणून विचारले.गियर व क्लजचे सेटिंग हाललय ,त्याने प्रतिउत्तर देवून मला नेटवर्क आहे का विचारले.'मी होय म्हणूनमोबाईल त्याला दिला.,त्याने यूट्यूबवरील क्लज सेटिंग कसे करावे हा मजकूर टाईप केला.दोन तिनं व्हिडिओ मधील एकवर क्लिक करून तो बघू लागला.तदनंतर त्याने सेटिंग हलवले पण काहीही साध्य झाले नाही.
एव्हाना अंधार पडायला सुरुवात झाली,म्हणून गाडी सडके पलीकडील मोकळ्या जागेत गाडी लाव.असं सांगितले.कसातरी रिव्हर गियर पडला हळूहळू गाडीमोकळ्या जागेत थांबवली.मग तिथं मोबाईल बॅटरीच्या प्रकाशात दुरुस्तीचा प्रयत्न करु लागला.
आता स्पष्टच जाणविले कीआपण कुणकेश्वर मंदिराकडे योग्य वेळेत जाऊ शकत नाही.मग समुद्रकिनाऱ्यावरील दृश्याची मजा बघणं तर लांबणीवर पडलं.मनात अनेक शंकांचे वावटळ येत होतं.आणि त्याचं निरसन करणं.असं मनातल्या मनात द्वंद सुरू झालं.थोड्यावेळानं शिरोड्याला मिळालेली स्मरणिका चाळत होतो.
एखादी जाहिरात गॅरेजची आहे काय?त्यातील नंबरवर संपर्क साधावा म्हणून.त्याचवेळी समोरच्या घरातील एक तरुण आमच्या जवळून त्याच्या दुचाकी कडे गेला.
गाडीवर बसून माझ्या जवळ येत होता त्यावेळी पत्नीने मला त्याला गॅरेजबाबत विचारायला सांगितले.मी लगेच त्याला,इथं जवळपास गॅरेज किती लांब असेल? काही सांगता येईल काय? गाडीला काय झालेय,त्याने आस्थेने मला मी विचारले.मी ड्रायव्हरला सांगाय लावले. त्याने काय झालयं ते सांगितलेल्या बरोबर तो मुलगा लगेच म्हणाला,मी इथं २ किमीवरील गॅरेजमधे काम करतो पण सोमवारचं आमचं गॅरेज बंद असते.
त्याने लगेच गाडीच्या खाली जाऊन चेकिंग करायला सुरुवात केली.दोनच मिनीटात बाहेर येऊन त्याने सांगितले, क्लजपेटातील आॅईल संपलय,त्यामुळे गियर पडेना आणि क्लज पडेना असं झालंय.'हे ऐकल्यावर त्याला विनंती केली की तू आम्हाली आॅईल आणून देतोस का,असं म्हणून त्यास पैसे देत असताना त्याने लगेच होकार दिला.त्याच्या सोबत आमचा ड्रायव्हर अॉईल आणायला दुचाकीवरून वाडीच्या पुढं गेले.काळोख वाढायला लागला म्हणून समोरच्या घरातील स्त्रीने रस्त्यावरील दिवांच्या स्वीच आॅन केला.माझं चित्त त्याची गाडी कधी येतेय,अन् आमची गाडी कधी चालू होतेय,याकडे लागलेलं रस्त्याला वाहनांची वर्दळही बऱ्यापैकी होती.वाडीच्या पुढं लाईटची रोषणाई लक्ष वेधून घेत होती.गाणी आणि किर्तनाचा आवाज ऐकायला येत होता.त्या अंदाजाने पुढं देवळात काहीतरी उत्सव साजरा होतोय यांचा अंदाज करत होतो.काही स्त्रिया पुढं जाताना दृष्टिस पडल्या.तेवढ्यात दोघेही गाडीजवळ आले.पण त्यांना पांढर आॅईल काही मिळालं नाही.'आता अवघड आहे' मनात म्हटलं,'इथंच तंबू ठोकायला आता लागतोय वाटत.','मी दुसऱ्या फिटरकडून चावी घेऊन येतो.'असं म्हणून तो समोरच्या घरी गेला.
   तदनंतर मागील रस्त्यानी जाऊन गॅरेजची चावी घेऊन आला.पुन्हा ड्रायव्हर आणि दोघेजण पुढच्या गावात जाऊन आॅईल घेऊन आले.मोबाईच्या उजेडात दुरुस्तीचं त्याने काम सुरू केले.तो आला त्यावेळी समोरच्या घरातील दोघेजणआमच्या जवळ येऊन आमची चौकशी केली.चहापानचे निमंत्रण दिले.तेव्हा अमोल यवस्थित काम कर,असं ते सद्गृहस्थ म्हणाले.
तेव्हा माझ्या ध्यानात आलं,की त्याचे नाव अमोल असून समोरचे घरही त्याचेच आहे.हायसं वाटलं,गाडीचं काम होईपर्यंत आम्ही शेती,वाळू व्यवसाय,प्रवास,
आंगणेवाडीची यात्रा आणि धार्मिक उत्सवावर गप्पा झोडल्या.कुणकेश्वरच्या मार्गाचीही माहिती घेतली.
    एव्हाना गाडीची दुरुस्ती करून राईड घेऊन दोघेही आले होते.आमच्या ड्रायव्हरची काम ओके झाल्याची खात्री झाली.अमोलला बील विचारले,त्याने ३०० रुपये सांगितले.मी विचार केला की अॉईलचेच २००रुपये झाली असतील,त्याने दोन हेलपाटे दुचाकी वरून मारले आणि मंजूरी फक्त १००रुपयेच मागितली.त्याने किती विश्वासाहर्यता आणि प्रामाणिकता दाखविली.मीच त्याला स्वत:हून गाडीचे काम केलेबद्दल १०० रुपये जादा बक्षिसी दिली.त्याच्या देवदूताप्रमाणे मदतीच्या सहकार्यास अल्पशी मदत करयाचा प्रयत्न केला.
अमोल आणि त्याच्या वडिलांना धन्यवाद देऊन त्यांचा मोबाईल नंबर घेतला.कधी कामानिमित्त वाईकडे आलात तर घरी येण्याचं निमंत्रण दिले.आभार मानून पुढे कुणकेश्वर मंदिराकडे गुगमॅपच्या संकेतावर मार्गस्थ झालो.
क्रमशः भाग-१४
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
यापूर्वीच्या कविता आणि लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड