आर्थिक मदत वृत्तांकन
मनःपुर्वक धन्यवाद हिंदूसम्राट दैनिक वृत्तपत्र .....
प्राथमिक शिक्षक श्री रविंद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे यांचे चिरंजीव हर्षद आणि चिरंजीव सौभाग्य कांक्षिनी सारिका यांचा शुभविवाह छोटेखानी समारंभात श्री जिव्हेश्वर सामाजिक मंदिर कराड येथे संपन्न झाला.अवास्तव खर्चास फाटा देवून सामाजिक व शैक्षणिक कार्य निरलसपणे करणाऱ्या संस्थांना आर्थिक मदत करुन सामाजिक बांधिलकी जपली.
नवदांपत्याच्या स्वागतासाठी समारंभाचे आयोजन न करता ओझर्डेस्थित श्री जिव्हेश्वर सामाजिक विकास संस्थेला सांस्कृतिक भवन बांधकामासाठी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओझर्डे व पतितपावन विद्यामंदिर ओझर्डे या संस्थांना स्पर्धापरीक्षेतील यशवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी निरंतर ठेव योजनेसाठी तर समाजातील निराधारांना आपुलकीची माया देवून हक्काचा निवारा देणाऱ्या माणुसकी हाच धर्म मानणाऱ्या यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट वेळे या संस्थेला सेवाभावी वृत्तीने आर्थिक मदत करुन खारीचा वाटा उचलला.सामाजिक व धार्मिक कार्य करणाऱ्या ओझर्डेस्थित क्रांतिसिंह नाना पाटील मित्र मंडळ ओझर्डे व भगवा कट्टा मित्र मंडळ वाई यांनाही मदतीचा हातभार दिला. या अनोख्या उपक्रमांसाठी लटिंगे परिवार , कलाविष्कार ग्रुप आणि शिक्षकमित्र परिवार वाई यांनी मौलिक सहकार्य केले.यावेळी मदतीचा धनादेश स्विकारताना
श्री जिव्हेश्वर सामाजिक विकास संस्थेचे पदाधिकारी श्री संजय कोदे,श्री विवेक टपळे,श्री अरुण गवते ,श्री गोट्या गवते.
यावेळी श्री सागर गजरे ,सौ हर्षदा पटेल व श्री प्रफुल्ल पटेल आणि लटिंगे परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.
लग्नसमारंभ प्रसंगी नवदांपत्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आप्तेष्ट पाहुणे,शिक्षण क्षेत्रातील अधिकारी,अतिथी, शिक्षक मित्र ,
स्नेहीजण, ग्रामस्थ इत्यादी मान्यवरांचे स्वागत दुर्गेकिल्ले,अनवट वाटा, निसर्ग पर्यटक आणि नामवंत साहित्यिकांच्या प्रेरक विचारांची पुस्तके देवून सन्मानित करण्यात आले.या अनोख्या पद्धतीच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वृत्तांकन व शब्दांकन- आशिष चव्हाण,वाई
http://ihra.org.in/news/37033-2/
Comments
Post a Comment