थाटमाट मिसळीचा काव्य पुष्प-१९२




थाटमाट मिसळीचा

भारीच थाट राऊ मिसळीचा
पितळेच्या भांड्यात वाढण्याचा
आदराने पाहुणचार करण्याचा
पुरातनपण खुलविण्याचा ❗

कुरकुरीत पोहे खमंग शेवपापडी 
दिमतीला नाजुकशी दह्याची वाटी 
लज्जत वाढवायला तळलेला पापड
कट रस्स्यासह कांद्याची वाटी❗ 

मटकी वाटाणा बटाट्याचा 
रस्सा झणझणीत तर्रीचा  
एकदा तरी चाखायला जावा 
रस्सा बारा गावच्या मिसळींचा❗

लुसलुशीत मऊ मऊ पाव
गप्पांगणात मिसळ मारतेय भाव
गोड चाखायला जिलेबीचं कडं
मिसळीच्या प्रकारांचे मिळत्यात धडं❗

शेतातल्या भात्याणाची नक्षी बघत 
शोभिवंत हॉटेलचा फेरफटका मारु
मराठमोळ्या अल्पोपहाराची खवैयेगिरी 
मनमुरादपणे क्षुधाशांती  करु❗
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-१९२
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड