प्रशिक्षण भारतीय संस्कृती क्रमशः भाग क्रमांक-१३२
🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌺साठवणीतल्या आठवणी
शैक्षणिक प्रशिक्षण
भारतिय संस्कृती पिठम्
क.जे.सोमय्या विद्याविहार मुंबई
📖📖📖📖📖📖📖
सकाळी लवकर आठलाच तयार झालो.
कॅटिनमध्ये उसळ पावचा नाष्टा करुन कॉलेजात आलो.
आठ दहाजण उपस्थित होते.
त्यांची ओळख करून घेताना श्री संजिवन जगदाळे बिदाल ता.माणचे भेटले आम्ही सातारचे आता तिघं झालो होतो.प्राचार्य कला आचार्य मॅडमनी दिवसभराच्या सकाळी ९ ते सायंकाळी ४ पर्यंतच्याकामकाजाची माहिती दिली. प्रशिक्षणाचा श्रीगणेशा परिपाठाने झाला. आमच्या अभ्यासाची सुरुवात योगासनांच्या तासाने त्यात थेअरी व प्रात्यक्षिक असायचे. ते श्रीमती राजुल कवाडिया मॅडमनी घेतले .मग प्राचार्य कला आचार्य, श्री भातखंडे सर,सौ ललिता नामजोशी मॅडम, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची कन्या ,फादर बिशप डाभ्रे याशिवाय अनेक गेस्ट लेक्चरर यांनी भारतीय संस्कृती पिठम् या प्रशिक्षणात मूल्य शिक्षणासाठी रामायण, महाभारत, वेदपुराण, उपनिषदे,संस्कृतभाषा,संगीत असे अनेकाविध भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य पूर्ण ग्रंथवैभव पहाता आले.ते ऐकायला चर्चा करायला संधी मिळाली.ग्रंथ वाचायला संधी मिळाली.
तिथं असताना श्री रामदास जगताप,श्री संजिवन जगदाळे या भागातल्या शिक्षकासह श्री रमेश घुटे वानगाव आणि जयवंत शेलवले यांच्या बरोबरही चांगलेच सुर जुळले होते.श्री रमेश घुटे सोबत नेव्हीनगर आणि वानगावला अनेकदा गेलो होतो.या सगळ्यांच्या समवेत मुंबईतल्या बऱ्याच ठिकाणां बरोबरच वानगांव,
मशे,पडघा, मुरबाड,कल्याण आणि पालघर अशा बऱ्याच ठिकाणी आम्ही मजेत मस्तपैकी भटकंती केली होती.तसेच हास्यपटू व गप्पीष्ट श्री अविनाश सोनावणे,पत्रकार व ग्रंथ अभ्यासू संदीप वाकचौरे, संदीप शिर्के,भारती सिताप,
स्मिता भातगावकर, सुनिता परदेशी,पवार सर,वैती मॅडम, शेलवले सर विशेषतः ठाणे,
नवी मुंबई आणि मुंबई परिसरातील शिक्षकवृंद जास्त प्रमाणात होते.
आठ महिने प्रशिक्षण मोफत आणि निवासी होते.वेळ मिळाला की आम्ही फिरायला बाहेर जायचो.जेवणानंतर बऱ्याच विषयावर गप्पा झडायच्या.शिक्षण,राजकारण, सिनेमा आणि नाटक हे मुख्य विषय असायचे.सिनेमे बघण्यापेक्षा दादरच्या थिएटरमध्ये आम्ही एकच प्याला आणि नटसम्राट ही गाजलेली नाटके बघितली.
फारच समाधान वाटले .
एकदा तर श्री संजिवन जगदाळे सरांच्या सोबत आमदार निवासात तत्कालिन आमदार श्री धोंडीराम वाघमारे यांच्या कडेजाण्याचा योग आला.सरांच्या एका पुस्तक प्रकाशनासाठी आमदार साहेबांचा अभिप्राय घेण्यासाठी गेलो होतो.
त्यावेळी आमदार निवास बघण्याची संधी मिळाली होती.
मित्रांसमवेत सीएसटी किंवा चर्चगेट फिरायला जाताना या मित्रांसोबत ट्रेनने प्रवास केला.तेंव्हा बरीच माहिती अनुकरण करून झाली.श्री रमेश घुटेचा फार आधार आणि मोलाचा सल्ला मिळायचा.गर्दीची ट्रेन पकडायची कशी.गर्दीतून खाली कसे उतरायचे. स्टेशनवर ट्रेन पकडायला नेमकं फ्लॅटफॉर्मवर कुठं थांबायचं याची तो वारंवार माहीती द्यायचा.त्यामुळे भीड चेपली.मी ही प्रवासी झाल्यामुळे नंतरच्या काळात कामानिमित्त मुंबईला गेल्यावरच बऱ्यापैकी ट्रेनने प्रवास केला.
कॉलेजला सुट्टी असली की मी एकतर भांडुप किंवा मैत्रीपार्क चेंबूरला जायचो.चेंबूरला माझे चुलत साडू श्री विनायक भंडारे यांच्या कडे जायचो.ते ठिकाण विद्याविहार पासून जवळच होते.ते बीएसटी ड्रायव्हर होते.त्यांच्याही समवेत पाहुण्यांच्याकडे कल्याण व डोंबिवलीला जाण्याचा योग आला.तसेच सर्व भारतभर प्रसिद्ध असलेले स्वकुळ साळी समाजाचे "स्वकुळ साळी समाचार" या मासिकाचे वर्गणीदार होण्याची संधी मिळाली.तेव्ही श्री.सोमनाथ कासटकर हे ठाणे जिल्हा स्वकुळ साळी समाजाचे अध्यक्ष होते.असं विविधांगी अनुभव घेत,सुट्टीत प्रसिद्ध स्थळांना भेटी देत देत आमचं प्रशिक्षण हसतखेळत सुरु होते.या प्रशिक्षणामुळे हिंदू धर्म आणि ख्रिश्चन धर्मावरील परिसंवाद, विविध कार्यक्रम, गुरुपौर्णिमेचा नृत्यसोहळ्याचा कार्यक्रम आणि पिठातील विविध इव्हेंटची माहिती झाली.योग विषयातील "प्राणायम" या घटकांवर प्रबंध लेखन करुन सादरीकरणाची संधी मिळाली.शिक्षक मित्रांच्यात विचारांचे आदानप्रदान झाले.आपल्या विचारांचा आणि अनुभवाचा आवाका लक्षात आला. सतत अपडेट रहायला गरजेचे बदल घडविण्याची संधी मिळाली.
नकळतपणे कौशल्याची सक्षमता पडताळण्याची संधी मिळाली.आपल्या काही नकारात्मक स्वभावी गुणांना मुरड घालून बदलाची संधी मिळाली.इतिहासाला साक्षी ठेवून वर्तमानकाळात सजगपणे रहाण्याचा विचार समजला.ज्ञानदान सर्वश्रेष्ठ आहे.भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा ग्रंथरुपात आहे.त्याचे वाचन करून नेमकेपणाने काय वेचावे हे व्यक्तीसापेक्ष निराळं असेल.पण स्वतःला सिद्ध आणि समृद्ध करण्यासाठी सकस साहित्याचे वाचन केलेच पाहिजे. धन्यवाद
भारतिय संस्कृती पिठम्.सर्व मान्यवर आणि शिक्षकमित्रहो.
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
क्रमशः भाग क्रमांक-१३२
Comments
Post a Comment