माझी भटकंती नायगांव खंडाळा १२९







🍁☘️🍁☘️🍁☘️🍁   
माझी भटकंती 
    ❄️स्मारकवाटा❄️
ज्ञानज्योती सावित्रीबाई
      फुले जयंती
     ३ जानेवारी २००१
〰️➖〰️➖〰️➖〰️➖ 
 समाजप्रबोधनाचे कार्य करण्यासाठी कलानंद आर्ट अॅकॅडमीची स्थापना करण्यात आली होती.जानेवारी महिन्यातील ३ जानेवारी हा दिवस सर्वत्र ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिन साजरा केला जातो.आमच्या या अॅकॅडमीच्या वतीनं आम्ही त्या वर्षी नायगांव ता.खंडाळा येथील प्रेरणास्रोत मधून ज्ञानज्योत आणायचे निश्चित केले होते.यासाठी युवतींना प्रज्ज्वलित ज्योत आणण्याची संधी दिली होती.किसनवीर महाविद्यालयात उत्साही युवती आणि आमच्या अॅकॅडमीच्या पदाधिकाऱ्यांनी उस्फुर्त  सहभाग घेतला होता.
सकाळी सात वाजता एक टेम्पो,चार मोटारसायकली आणि ३०ते ३५ युवतींचा संच आणि सहकाऱ्यासाठी आम्ही सोमनाथ क्षीरसागर,फोटोग्राफर श्री सोमनाथ भंडलकर, श्री अनिल फरांदे सर,चरण गायकवाड असे सगळेजण सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी नायगांवला" ज्ञानज्योत "आणण्यासाठी निघालो.
साधारणपणे ओझर्डे ते नायगांव हे ४० किलोमीटर अंतर असावे.ज्योत आणण्यासाठी लागणारे सर्व साहित्य घेऊन आम्ही निघालो होतो.नऊच्या दरम्यान आम्ही स्मारकात पोहोचलो.स्मारकातील विविध शिल्पे आणि वस्तुंची पाहणी केली.साध्या वाड्याचा लुक तसाच ठेवून तेथील स्मारक सुशोभित केले आहे.सर्व युवतींनी ज्योत प्रज्वलित केली.सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस सर्वांनी विनम्र अभिवादन केले. 
    ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव करण्याऱ्या घोषणा करुन परिसर दणाणून  सोडला.
इतरही सगळेजण आमच्यात जयघोष करायला सहभागी झाले. सर्वांचा ज्ञान मशालीसह ग्रुप फोटोसेशन करून जयघोष करत निघालो. ज्योत एका धावपटूने  हातात घेऊन आमची मशाल मिरवणूक निघाली.दोघेजण मोटार सायकल वरून पुढील धावपटूंना घेऊन हळूहळू पुढे निघाले होते.ज्योती समवेत दोन्हीकडे गाड्या होत्या.सर्वात मागे टेम्पो होता.टेम्पोत स्पिकरवर घोषणा दिल्या जात होत्या.ढोल ताशाही साथला होता. उत्साहाने युवती ज्योत घेऊन धावत होत्या.दोन दोन किमी अंतर धावत होत्या.टेम्पोतील बाकिच्या मुली उत्साहात घोषणा देत होत्या.सगळ्यांना केळी फरसाण या अल्पोपहाराची टेम्पोतच सोय केली होती.खंडाळा टोल नाक्यावरुन घाटाकडे जाण्याऐवजी मधल्या रस्त्याने पुण्याकडे जाणाऱ्या बोगद्यातून वेळ्याला आलो होतो.त्यावेळी पोलिसांनी केलेल्या सहकार्यामुळे आमचं खंबाटकी घाटातून ज्योत घेऊन येण्याचा लांबचा  तकाटा वाचला होता.हायवेला  पोलिसांचे चांगले सहकार्य लाभले होते.ज्ञानज्योत मिरवणूक शिस्तीने चाललेली होती. खेळाडू युवती असल्यामुळे अंतर सहजपणे कमी कमी होत होतं.उन् लागायला सुरुवात झाली होती...
वेळे,सुरुर,कवठे करून आम्ही टाकूबाईच्या माळावरुन जोशी विहीर कडे निघालो होतो.त्यावेळी धावणाऱ्या एका मुलीची चप्पल तुटली.लगेच गाडीवरील दुसऱ्या मुलीकडे ज्योत दिली.आमचा टेम्पो पुढं गेला होता.दोन गाडीवर टिबल सिट होती.ज्योत पुढं न्यायला सांगितली.तेवढ्यात एक गाडी बंद पडली ती लवकर चालू होईना म्हणून त्या दोन मुली आणि मी आम्ही हळूहळू पुढं पुढं चालत निघालो होतो.शंभरदोनशे मीटर पुढं गेलो होतो त्यावेळी पोलिस गाडीच्या सायनरचा आवाज कानावर पडला म्हणून गाड्यांना वाट देण्यासाठी रस्त्यावरुन बाजूला गाड्या जाईपर्यंत उभे राहिलो.आमच्या समोरुन पायलट गाडी गेली. त्याच्या पाठोपाठ  लाल दिव्याची गाडी गेली.ज्योत घेऊन जाणाऱ्या मुलींना धावताना अडचण होवू नये म्हणून पुढं जाताना गाड्या सावकाश घेतल्या होत्या.वाहतूक पोलिसांना मनापासून धन्यवाद.आम्हीही धावतच निघालो होतो.काही वेळाने सगळे जोशीविहीरला पोहोचलो.तिथं आमच्या ज्योतीचे स्वागत सामाजिक कार्यकर्त्या  अॅड. वर्षाताई देशपांडे यांनी केले.त्यामुळे सगळे आनंदून गेले. तदनंतर गावात पोहोचल्यावर ज्योतीचे व आमचे सर्वांचे स्वागत धुमधडाक्यात झाले.
आम्ही चालवू हा पुढे वारसा...... ज्ञानज्योती,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना कोटी कोटी प्रणाम व विनम्र अभिवादन ❗.....

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई 
भटकंती -१२९

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड