आमची भटकंती रिंगरोड उत्तरार्ध भाग क्रमांक-१३५
🌿🍂🌳🍃🌳🍂🍃☘️
निसर्गाच्या सहवासात
उत्तरार्ध भाग क्रमांक-१३५
आकोशी कोंढवली करत करत परतवडीत आलो.फणसे सरांचा हा भाग असल्याने बालपणीच्या आठवणी सांगितल्या. ते आध्यात्मिक संप्रदायातील वारकरी आणि किर्तनकार म्हणून ओळखले जातात.तसेच प्रत्येक गावात पैपाहुणे त्यामुळे" गुरुजी बरं हाय का"या परिवलीच्या शब्दाने विचारपूस करत.पायवाटा,डोंगरदऱ्या त्यांच्या परिचयाच्या,
जलाशयात मनसोक्त पोहणं आणि दोस्तांसमवेत भटकणं.गप्पांच्या ओघात मुख्य: रस्ता सोडून मंदिराजवळ गाडी थांबवली तेव्हा समजलं आपण गावात आलोय.मंदिरं म्हणजे गावचे ग्रामदैवत सध्या लाॅकडाउनमुळे गावाकडे जाधव सर होते. नव्याने बांधलेल्या टोलेजंग बंगल्याची पहाणी केली.
घाईगडबडीत बनवलेल्या अल्पोपहाराचा आस्वाद घेतला. जाधव सरांनी सर्वांची छान सरबराई केली.
तदनंतर प्रवेशद्वाराजवळ आठवण म्हणून सर्वांचा ग्रुपफोटो घेतला.समोरच दिसणाऱ्या अडुळश्याचे झुडूप पाहून दिलीप जाधवांचे कुतूहल वाढले.त्याच्या औषधी गुणधर्माची माहिती सुनील जाधवांनी दिली तर एक पिवळे झालेले पान तोडून त्याचा विडा करुन चघळायला लागले.मीही तसंच अनुकरण करून एक पान चघळलं.अगोदर कडवटपणा जाणवला.जवळच गुुळवेल असल्याचे सहदेव फणसे सरांनी सांगितल्यावर रमेश जाधव सरांनी त्याचा काढा इतर घटक पदार्थ घालून कसा बनवायचा याचा युट्यूब वरील व्हिडीओ बघण्याची सुचना केली.दिलीपने गुळवेळाचे काही तुकडे परसबागेत लावायला व काढा करायला घेतले. श्री रमेश जाधव सरांचा निरोप घेऊन आम्ही श्री सहदेव फणसे सरांच्या नांदगणे गावाजवळ आलो. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या ग्रामदैवताचे दर्शन घ्यायला सरांनी गाडी थांबवली..ते दर्शनाला देवळाकडे वळले तर आमची पावलं डाव्या बाजूला नदीकडे वळली.तेथून दिसणारं दृश्य मनमोहक दिसत होते.केटस पॉईंट्सचा (एलिफंट) नजारा लांबूनही अप्रतिम दिसत होता.तर समोर अथांग जलाशय आणि त्या जलाशयात उतरण्यासाठी चक्क बांधीव पायऱ्या होत्या.दोन्ही नद्यांच्या काठावर अनेक गावे आहेत.परंतु नदीत उतरण्यासाठी पायऱ्या प्रथमतः बघायला मिळाल्या.
पायऱ्या उतरून घोट्याइतक्या पाण्यात उतरलो.छानशी फोटोग्राफी करत असताना पायाला काहीतरी चावलं म्हणून खाली पाहिले तर काय पायांच्या टाचांना छोटे छोटे मासे चावत होते.त्यांना वाटलं असेल आपलंच खाद्य पदार्थ आहेत. इतरांनाही हा अनुभवही घेतला.श्री भास्कर पोतदार सरांच्या दुकानाशेजारी "फीश मसाज " केला जातो असे श्री दिलीप जाधव म्हणाले, तर याला मान हलवून त्याने होकार दर्शविला.दोन तीन मिनिटे आमचा फिश मसाज होत असताना श्री सहदेव फणसे सरांनी या ठिकाणच्या सुखदुःखाच्या घटना सांगितल्या..तदनंतर पुन्हा निसर्गादारी भेट देण्याचं नियोजन करून पुढं निघालो..थोड्याशा अंतरावर गेल्यावर फणसे सरांनी या भागातल्या शाळेतील घटना सांगितल्या..कृष्णा नदीच्या उगमाच्या प्रवाहाच्या पुढेही वेदगंगा नावाचा ओढा धनगरवस्तीच्या पुढून भैरीच्या घुमटी येथून येतो ,असं सांगितलं.ही इतरांना नवीन माहिती मिळाली.एव्हाना आम्ही कृष्णा नदीवरील उळुंबपूल ओलांडून कातकरी वस्तीत पोहोचलो होतो.समोरच धरणाची भिंत दिसत होती.तुरळक फिरस्तेही दिसत होते.सहाएक कुटूंबियांना ''दिवाळी कीट" भेट देऊन दिवाळी शुभेच्छा दिल्या.त्यातील एकजण इतरांना साड्या दिल्या मग आमाला साडी का दिली नाही म्हणून जाईपर्यंत विचारत होता.नंतर आलोकी देतो, असं म्हणून बोळवण केली.तरी ही तो ,'मी धरण बांधायच्या वेळेपासून इथं आहे.मला का देत नाही? 'असं विचारतच होता. शेवटी श्री सहदेव फणसे सरांनी त्याची समजूत काढली.तदनंतर आम्ही परतीच्या वाटेला लागलो.वयगांव,दह्याट ,बोरगाव करत करत मालतपूर जवळील रस्त्याच्या कडेला असणाऱ्या वस्तीवर थांबून तिथं चार कुटूंबियांना''दिवाळी कीट" दिले. तिथं एक नववीत शिकणारी मुलगी होती.
काहीका होईना पण संथगतीने वंचित समाजातील मुलं शिक्षणाच्या प्रवाहात सामील आहेत.याचे समाधान वाटले.चिखली फाट्यावरील या भागातील फेमस जय तुळजाभवानी हाॅटेलमध्ये खुमासदार वडापाव आणि लज्जतदार चहा घेऊन आम्ही वाईत पोहोचलो...२५
कुटूंबियांना एकेक दिवाळीची पणती दान केली..आणि दिवसभर निसर्गाच्या सहवासाने प्रफुल्लित झालो. निसर्गातील वेचक वेधक दीपस्तंभ भेटले.त्यांच्या
सहवासातील आनंदीक्षण या मार्गाने पुन्हा फिरताना स्मृतीत येतील.....
आज शिक्षक मित्र परिवारातील निसर्गवेडे श्री भास्कर पोतदार, श्री सुनील जाधव,श्री सहदेव फणसे व श्री दिलीप जाधव होते...
दिनांक १२ नोव्हेंबर २०२०
क्रमशः भाग क्रमांक-१३५
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
Comments
Post a Comment