गावच्या आठवणी- कलाविष्कार नाट्य रंगभूमी, ओझर्डे

गावच्या आठवणी नाट्य रंगभूमी






🔔🎙️📣🔔🎙️📣🔔🎙️📣🏵️
           गावच्या आठवणी-नाटक

         🎭  नाटयरंगभूमी 🎭

          🌸 कलाविष्कार नाट्य मंडळ ,ओझर्डे 
🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️
     🔔तिसरी घंटा वाजते.🔔

📣📢🎙️ सुस्वागतम , सुस्वागतम श्री गणेशाला अभिवादन करुन  रंगदेवतेसह नाट्यदेवतेला विनम्र अभिवादन करून कलाविष्कार नाट्य मंडळ,ओझर्डे सहर्ष सादर करीत आहे.धमाल विनोदी तीन अंकी सामाजिक नाटक,'लहानपण देगा देवा,लहानपण देगा देवा,.पात्र परिचय पार्श्वसंगीताच्या हळू आवाजात सुरू व्हायचा.नायकाच्या भूमिकेत.चरित्र अभिनेत्याच्या भूमिकेत..असं करत करतशेवटी..निर्माता..दिग्दर्शक.श्री भाऊसाहेब कदम(माधवराव)..अन् नाटकाची नांदीने सुरुवात व्हायची...
   प्रत्यक्ष  तीन अंकी नाटक मराठी शाळेच्या मैदानावर सादर व्हायचं.रसिक प्रेक्षक टाळ्यांच्या गजरात कलाकारांना दाद द्यायचे.भूमिका गाजविलेल्या कलावंतांना बक्षीसे मिळायची.तीच कसदार अभिनयाची पोच पावती मिळायची.लय भारी वाटायचे नाटक बघायला.पब्लिक जाम खुश असायचे.
    पूर्वी गावचा सांस्कृतिक ठेवा यात्रा,सोंगे , भजन व सार्वजनिक उत्सवातून जतन केला जायचा.
त्याच्या जोडीला तरुणाईला सिनेमाची भुरळ असायची.अश्याच सिनेमावेड्या हौशी तरुण कलावंतांनी एकत्र येऊन कलाविष्कार नाट्य मंडळाची स्थापना करुन ओझर्डे गावातील प्रेक्षकांवर नाटकाचे गारुड केले होते. सन१९९५ पर्यंत दरवर्षी हौसेने सामाजिक आशयावर गाजलेल्या लेखकांची नाटके सादर करुन,नाटकाची आवड निर्माण केली होती.कलाविष्कार नाट्य मंडळाने तेव्हा विविध लेखकांची गाजलेली नाट्यसंहिता सादर करुन रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती.
   कलाकृती सादर करण्यापूर्वी अनेक सोपस्कार पार पाडावे लागतात.नाटकाचे पुस्तक मिळविणे..त्यावर चर्चा घडवून आणण्यासाठी मिटिंग आयोजित करणे..प्रमुख मंडळीने पुस्तक वाचून निर्णय घेणे.
भूमिका ठरविणे.श्री पद्यावती देवीच्या मंदिरात मंडळाच्या सदस्यांनी पुस्तक पूजन करून देवीचा नाट्यसफलतेसाठी आशिर्वाद घेणे.मग दररोज रात्री ग्रामपंचायतीच्या माडीवर तालीम (रिहलसल) सुरू करणे.नटी ठरविणे...वर्गणी वसूल करणे आणि तिकिट छपाई ,गणपत तात्यांचा मंडप,लाईट,स्पीकर ,फ्लॅटसीन व कणात लावून घेणे.ठरलेल्या तारखेपूर्वी रंगीत तालीम घेऊन शो सादरीकरण.नाटकाचे मेकअप व प्रत्यक्ष लागणाऱ्या सर्व वस्तू संकलित करणे.मेकअप मन व वेषभुषाकार मंडळातील कलाकार.
       नाटकाची ,'खुशखबर खुशखबर खुशखबर 'अशी साद अनाउन्समेंट नाटक होण्यापूर्वी अगोदर करत रहाणे,शो दिवशी तिकिट विक्री करणे.पब्लिकला गेटमधून आत सोडणे .नाटक सादर करणे..स्टेजवरील कलाकार नाटक करतात.बॅकस्टेजच्या कार्यकर्त्यांना सहकार्य केल्यामुळेच  नाटक यशस्वी पार पडते..
        कलाविष्कार नाट्य मंडळाची
          गाजलेली नाटके
🎭इनामदारांची सून
🎭जखम
🎭एकटी
🎭भोवरा
🎭जखम
🎭लहान पण देगा देवा
🎭वाहतो ही दुर्वांची जुडी
कलाविष्कार नाट्य मंडळातील कलाकारांनी सादर केलेल्या भूमिका आजही चिरस्मरणात आहेत..
🎭श्री पंडित कदमांनी सादर केलेला साक्षात्कार मधील कोकणचा तात्या रुबाबदार आणि विनोदी अभिनय.. एन्ट्रीला टाळ्याच घेणार.सहज सोप्या भाषेत अभिनय सादर करायचे.धमाल खळखळूून हसवायचे.
🎭श्री अरुण चोपडे यांची कित्येक नाटकातील भावस्पर्शी , हळवी व सहनशील भूमिका पाहून मनात हळहळ वाटायची.डोळ्यात अश्रू यायचे.सहजसुंदर अभिनय भावस्पर्शी वाटायचा.
  🎭 "दिगो "या नावाने मित्रांमध्ये प्रसिद्ध असलेले श्री दिलीप टपळे  चौफेर आणि कसदार भूमिका
साकार करताना व्यावसायिक रंगभूमीवरील कलाकारासारखे अभिनय सादर करायचे. नायक आणि खलनायकाच्या  सादर केलेल्या भूमिका आजही लक्षात येतात..इनामदारांची सून नाटकातील -इनामदार,जखम मधील -जंगूरा,एकटी मधील -आनंद,भोवरा मधील -डाॅ.विश्राम लहान पण
 देगा देवा मधील -बाळू ,वाहतो ही दुर्वांची जुडी मधील -श्रीकांत आणि अग्निदिव्य मधील -अरुण इत्यादी भूमिका सादर केल्या होत्या.
🎭चरित्र अभिनेते म्हणून प्रत्येक नाटकात यशस्वी व समर्थपणे भूमिका सादर करणारे श्री विजय दिक्षीत ,अप्रतिम संवाद फेक आणि कसदार अभिनय करायचे.प्रेक्षकांना खिळवून ठेवायचे.
 🎭स्त्री पात्र तर हुबेहूब श्री विवेक (राजू)टपळे अप्रतिम वठवायचे.त्यांचीसंवादफेक,ह्रदयस्पर्शी  अभिनय रसिकांना भावायचा.ड्रेपरी व मेकअपने  प्रत्यक्ष स्त्रीच भूमिका साकारतेय असं वाटायचं.ते समरस होवून भूमिका साकार करायचे. महिलावर्ग  जाम खुश व्हायचा...त्यांची गुड बाय डाॅक्टर या नाटकातील साधूची भूमिका आजही आठवते.
  🎭एका नाटकात शिवाजी जाधव (आऊ)यानेही स्त्री भूमिका सादर केली होती. विनोदी भूमिका श्री तानाजी निकम, श्री मोहन जरे व श्री प्रकाश दिक्षित छान सादर करायचे.नाट्यरसिक त्यांच्या एन्ट्रीला मनमुरादपणे हसून दाद द्यायचे..
 🎭🌸भाऊसाहेब कदम तर  नाटकाचे डायरेक्टर नाटकातील महत्त्वाचे  मास्टरपिस स्वत:त्या भूमिकेत जाऊन रिहलसलला करून दाखवायचे.हावभावयुक्त संवाद फेक समयसूचकतेने कशी करावी हे प्रत्यक्ष सिन करून दाखवायचे.त्यांनीही नाटकातील मास्टर ब्लास्टर भूमिका केलेल्या आहेत.
     सहकलाकारही भूमिका उठावदार पणे सादर करायचे.  श्री तानाजी (बाबा) पिसाळ,श्री विष्णू तांगडे,श्री संजय किसन पिसाळ,श्री शिवाजी चव्हाण (बापू),श्री हणमंत पिसाळ,श्री नानासाहेब शिंदे,श्री विजय तांगडे ,श्री दिलीप खरात व इतर अनेक कलाकारांनी विविध नाटकात केलेल्या आहेत...
📖 नाटकातील प्रमुख काम "प्राउटिंग "करणे.विंगेत दोन्ही कडे दोघे उभे राहून नाटक सुरू असताना आपल्याकडील पात्राला पुढे काय बोलायचं त्याची सुरुवात हळू आवाजात अगोदरच सांगणे. यावेळी समयसूचकतेने लक्ष ठेवून मंदप्रकाशात बोलावं लागायचं. याची जबाबदारी श्री मधूकर पिसाळ यांच्या कडे असायची.त्यांना दररोज तालमीला यावं लागायचं.
मलाही प्राउटिंगचे काम करण्याची संधी दोन-तीन नाटकात आणि लहानपण देगा देवा या नाटकात छोटासा पोलिसाचा रोल करायची संधी मिळाली होती.श्री बाळासाहेब जाधव हरहुन्नरी कलाकार ते ही नाटकात छोटा रोल करायचे..पण त्यापेक्षा पडेल ते व कुणीही सांगितलेले काम विनातक्रार करायचे.
  🔈नाटक यशस्वी होण्यासाठी बॅकस्टेजला श्री बाळासाहेब कोठावळेश्री बाळासाहेब(रविंद्र) जाधव,श्री रामचंद्र पिसाळ गुरुजी ,श्री अरविंद(आप्पा) तांगडे,श्री गोविंद फरांदे ,श्री किसन(आबा) तांगडे,श्री मोहन टपळे गुरुजी, ,श्री मोहन तांगडे,श्री रविंद्र पिसाळ,श्री शंकरराव शेलार गुरुजी ,श्री प्रकाश धोंडिबा पिसाळ,श्री चंद्रकांत कदम,श्री बबन जंगम,श्री महिंद्रे ,श्री नंदू खरात,श्री गणपती लटिंगे ,श्री गणपत कदम तात्या मंडपवाले ,जाधव साउंड सिस्टीम आणि कलाविष्कार नाट्य मंडळाचे कार्यकर्ते.घरचे कार्य समजून एकजूटीन काम करत. नाटक गाजवून दाखवत असत.
     सलाम सर्व हौशी रंगभूमी कलाकारांना......
   प्रेक्षकांची मनोरंजनाची रुची बदलली.घरोघरी टीव्ही झाल्याने अनेक वाहिन्यांवरील सिनेमे ,नाटके व मालिकांमुळे काळपरत्वे मनोरंजनाच्या माध्यमात बदल होत गेले.

एखाद्या कलाकाराचा नामोल्लेख राहिला असल्यास क्षमस्व.
🍀🌹🌹🍀🌹🍀🌹🍀🌹🍀🌹
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
दिनांक ११ मे २०२०

खूपच सुंदर दादा!

क्रिकेट अन् नाटकाच्या आठवणीवरचे तुमचे लेख माझे आवडते!👌
श्री सुनील शेडगे आप्पा
पत्रकार शिक्षक मित्र सकाळ वृत्तसेवा, सातारा


दादा,छान आठवणी आहेत,यात्रेत सादर होणारी तीन अंकी नाटके ही ग्रामीण महाराष्ट्राची परंपरा आता कालानुरूप लोप पावली,परंतु एके काळी ग्रामीण भागातील किंबहुना गावातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ आणि आंनद या परंपरेने दिला.मुंबईतील चाकरमानी गावातील कलाकारांचे तोंडभरून कौतुक करायचा आणि आर्थिक पाठबळही द्यायचा तेव्हा कलाकारांना आभाळ ठेंगणे व्हायचं.
    तीन चार महिने तालमी चालायच्या.आणि यात्रेच्या रात्री नाटक सादर केलेला कलाकार दुसऱ्या दिवशी रुबाबात ऐटीत चालायचा ,लहान लहान मुलं त्याच्याकडे एका सेलिब्रिटी कडे पाहावे तशी पहायची.खरंच मजा होती.
  तिसरी घंटा आणि नांदी बंद झाली पण तिचा आवाज अजूनही कानात घुमत आहे.

श्री उद्धव निकम सर
छायाचित्रकार

बापरे, आम्ही स्वत: काम करुनही आमचेकडे यातले कुठलीही आठवणीत रहाण्यायोग्य साधन सामुग्री नाही. गुरुजी तुम्ही कुठुन येवढे फोटो प्राप्त केलेत.एकादा जुना दस्तऐवज घरातुन शोधायला आपण अनेकवेळा टाळाटाळ करतो.पण तुमच्या या धडपडीच्या कलेला मनापासुन प्रणाम.आम्हांला जे बायकामुलांना अभिमानाने सांगायला जमलं नाही ते तुम्ही सहजसाध्य केलंत.
   धन्यवाद सर. आमच्या आठवणी ताज्या केल्याबद्दल व जगासमोर सादर केल्याबद्दल.

श्री विवेक टपळे ओझर्डे वाई
हौशी नाट्य कलावंत 

किती छान आठवणी... नाटक हे जुन्या काळात मनोरंजनाचे सर्वात महत्वाचे साधन... सारा गाव एकरूप व्हायचा... सर खूप छान आठवणी जपून ठेवल्या आहेत... त्याचा तुमच्या सोबत आम्हीही आनंद घेतोय.... 
      जुन्या काळातील या रेशमी, रुपेरी 
बहुमोल आठवणीं पुन्हा एकदा तो काळ जागवताहेत... 
    Hats of you. 
👍🙏🙏👌👌💐💐
श्री राजेन्द्र वाकडे सर तारळे
भ्रमंती आनंदयात्रा लेखक



          

Comments

  1. सुंदर लेखन, नाटकाची छान माहिती

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड