सोमैया कॉलेज भाग क्रमांक-१३०
🌱🔅🌱🔅🌱🔅🌱🔅
साठवणीतल्या आठवणी
शैक्षणिक प्रशिक्षण
सन १९९७-९८
✒️📚सोमय्या कॉलेज विद्याविहार, मुंबई
➖➖➖➖➖➖➖➖
इयत्ता पहिलीचे नवीन अभ्यासक्रमाचे स्मार्ट पी.टी.निवासी प्रशिक्षण जकातवाडी येथे सन १९९७ साली एप्रिल महिन्यात होते.वाशिवली केंद्रातून केंद्रप्रमुख श्री गुलाबराव गायकवाड यांच्या सह माझी निवड झाली होती.ते प्रशिक्षण निवासी स्वरुपाचे होते.जिल्हास्तरीय प्रशिक्षण घेऊन तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून तालुकास्तरावर निवड झाली. २ मे ते २ जून पर्यंत कन्याशाळा,वाई येथे तालुकास्तरावर दोन बॅचमध्ये प्रशिक्षणासाठी उपस्थित होतो.निवासी प्रशिक्षणाची सुरुवात सकाळी, योगासन अल्पोपहार, घटकसंच प्रात्यक्षिक
,गटकार्य,भोजन,प्रत्यक्षपाठ, लेखन,स्वाध्याय आणि सांस्कृतिक कार्यक्रम असा नित्यक्रम असायचा.सांस्कृतिक कार्यक्रमात क्षमतेची दिंडी,मूकाभिनय,रेकार्ड डान्स आणि सूत्रसंचालन अशा अनेकविध रुपात स्टेजवर सादरीकरणाची संधी मिळाली होती.केंव्हाही कन्याशाळेत गेलो की प्रशिक्षणातील आठवणी स्मरणात.काहीवेळ मी त्या आठवणीत हरवून जातो..
असं हे प्रशिक्षण घेऊन नव्या उमेदीने शाळेत कृतीयुक्त अनुभव देत होतो.असेच ऐकेदिवशी ध्यानीमनी नसताना नवीन प्रशिक्षणाचा आदेश घेऊन केंद्रप्रमुख श्री गुलाबराव गायकवाड सर आले.तो दिवस होता २५ जुलै १९९७.भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी जिल्हास्तरावरुन निवड झाली होती.आठ महिने कालावधीचे ते प्रशिक्षण होते.मग काय ?केंद्रप्रमुखांनी अभिनंदन केले.
शाबासकी देऊन सर्वासमक्ष कौतुक केले."उद्या कार्यालयात जाऊन रिलीव्ह आदेश घेऊन या आणि शाळेतून रिलिव्ह व्हा ," अशी सूचना देवून मार्गस्थ झाले.इतर सहकारी शिक्षकांनी अभिनंदन केले.
कार्यालयातून आदेश घेऊन शाळेत आलो.शाळेने छोटेखानी शुभेच्छा कार्यक्रम घेतला.मग शाळेच्या अतिरिक्त कामाचे नियोजन करुन दिले.वेळ मिळाली की शाळेत येण्याचे आश्र्वासन देऊन गावी निघालो.कोंढावळे गावातील घरटी माणसं रोजीरोटीसाठी मुंबई व वाशी परिसरात माथाडी,मेहता, टॅक्सी चालक ,कांदा बटाटा दुकानदार आणि इतर कामगार म्हणून आहेत. त्यामुळे मुंबईला गेलो की भायखळा आणि वाशी परिसरात लोकांकडे जाता येईल.शैक्षणिक उठाव मिळवता येईल असा मनाशी निश्चय केला.पावसाळ्याचे दिवस होते. दुपारनंतर निघालो वाईला .बस स्थानकात जाऊन आजचं रात्रीच्या नऊच्या गाडीचे रिझर्व्हेशन केले.वाठार गाडीने ओझडर्याला आलो. पत्नीने बॅग भरून ठेवली होती.आठच्या वाठार- वाई गाडीने पहाटे सचिन बरोबर मुंबईला येतोय असा फोन एसटीडी तून चुलत्यांना केला.साडेसात वाजता सचिन आणि मी जेवण उरकले.देवाच्या ,आई व वडिलांच्या पाया पडलो.मुलांंची आणि घरातल्या सगळ्यांची काळजी घ्यायला सांगितली.बायकोही माझ्या पाया पडत असताना तीला हुंदका अनावर झाला.तीला रडू कोसळले.माझे ही डोळे पाणावले.समजुत काढू लागलो,"मी दर महिन्याला सुट्टी अॅडजेस्ट करून वेळमिळाली की येणार आहे.फोन वरुन शामराव शिंदे (आबा) यांच्याशी संपर्क साधेन,मुलांची काळजी घ्या, असं आंजरत गोंजरत समजावले आणि ओझर्डे स्टॅण्डवर आलो.घालवायला बऱ्यापैकी मित्र आणि घरची होती.थोड्याच वेळात वाठार एसटी आली सगळ्यांना गुडबाय केला.पंधरा मिनीटात गाडी वाईला बसस्थानकावर आली.रात्रीचं बसस्थानकावर विरळ प्रवासी होते.विशेषत मुंबई फलाटावर गर्दी होती.बाहेर खाजगी गाडीवाले मुंबई,पुणे अशी आरोळी देवून प्रवाशांना खाजगी वाहनाकडे बोलवत होते. आम्ही दोघजण मुंबई गाडीची वाट बघत होतो.बरोबर पावणेआठला गाडी फलाटला लागली... कंडक्टरने पाच ते वीस नंबरच्या सीटवर बसू नका अशी गाडीतून खाली उतरताना आणि प्रवासी गाडीत चढताना सूचना केली.गाडीठाणे,मुलूंड,भांडूंप मार्गे जाणार आहे..असं दोनतिनदा सांगितले.मग तो दारातून बाजूला झाला की गडबड करीत सगळे गाडीत चढू लागले..आमचं अकरा व बारा नंबरचे रिझर्व्हेशन होते.त्या सीटवर बसलो.साहित्याची एक बॅग वरच्या कॅरियरमधे ठेवली आणि खिडकीच्या कडेच्या सीटवर बसलो.... कंडक्टरने घंटी वाजवली तदनंतर ड्रायव्हर आला त्याने गाडी सुरू केली.कंडक्टरने सगळ्या रिझर्व्हेशन सीट आल्याची खात्री करून डबल बेल दिली. रातराणीगाडी मुंबईला निघाली.कंडक्टरने तिकिट तिकिट म्हणायला सुरुवात केली.....गाडी रस्त्यावर धावू लागली...पावसाला सुरूवात झाली होती.. गाडीच्या हेडलाईटच्या उजेडात पावसाचा आवाका दिसत होता.चुलत भावाशी गप्पा मारत, डुलक्या काढत प्रवास चालला होता...
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
भटकंती क्रमांक-१३०
Comments
Post a Comment