मैत्री टूर वरसगांव धरण परिसर भाग क्रमांक-१४४


🦋🍁🌿💫🦋🍁🍀 
 मैत्री टूर 
भोर ,वरसगाव धरण बॅकवॉटर व लवासा माऊंटन लेक सिटी
💫🦋💫🦋💫🦋💫
२१ नोव्हेंबर २०२०
माझी भटकंती भाग क्रमांक-१४४

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
क्रमशः भाग क्रमांक-३
        वरसगांव धरण प्रवास
------------------------------------
   कल्याणी धाब्यावरुन निघालो पुढं नसरापूर टोलनाका पास करुन खेडशिवापूर आल्यावर गाडीनं डावीकडचा सिंग्नल दिल्यावर खेडशिवापूर गावातून किल्ले सिंंहगडाकडे मार्गस्थ झालो.
थोड्यावेळात गड भ्रमंती करण्याचा कयास मनात ठेवला होता पण काय घाट. शुभारंंभीच्या चेकपोस्टजवळ रस्ता बंद केला होता.लॉकडउनमुळे गडावर जाण्यास प्रवेशबंदी असल्याने रस्ताही बंद होता.रिटर्न घेऊन पुन्हा हायवेला यायला लागलो.धायरी फाट्यावर लेफ्ट टर्न घेऊन सिंहगड रस्त्यानेखडकवासला धरणाच्या कडेकडेने निघालो..
एव्हाना सायंकाळ होत आली होती.चहाची तलफ सगळ्यांना झाली होती.मग छोटेखानी "एकदा चहा प्याल तर पुन्हा पुन्हा याल" अशी खासियत असणारा खानापूर येथील बोर्ड बघून सारथ्यांनी गाड्या थांबविल्या.गुजराती चायवाला होता.त्याच्या पत्नीने कडकमिठा चहा बनविला.लज्जतदार मसाला चहाचा आस्वाद घेतला. आणि मार्गस्थ झालो.घाटरस्ता चांगला असल्याने गाडीचा वेग वाढला.सूर्यास्ताचे बिंब गुलाल उधळत अस्ताला जात होते आणि आमचा प्रवास मुक्कामाच्या ठिकाणी चालला होता.वरसगांव धरणाच्या पायथ्याने आम्ही पुढे सरकत होतो.आता एका बाजूला अथांग जलाशय आणि दुसऱ्या बाजूला डोंगररांग त्याच्या मधील कच्च्या रस्त्याने आम्ही जात होतो.तिन्हीसांज होऊन गेली होती.कच्च्या रस्त्याने गाडीचा वेगही मंदावला होता.कधी एकदा रिसॉर्ट येतंय असं झालं होतं.कारण २५ किमीच्या अंतरावर केवळ दोन ट्रॅक्टर आणि एक डंपर सोडला तर चिटपाखरूही नाही. कोणतंही वाहन पुढून आले नाही आणि आम्हाला ओलांडून गेले नाही.मोबाईलही रेंज अभावी  रस्ता चुकलाय का काय असं वाटू लागलं.कालांतरांने अंधार वाढला आजूबाजूच्या गावांचं दर्शनही तुरळक होते.केवळ गाडीच्या हेडलाईटचाच प्रकाश दिसत होता.त्याच उजेडात हळूहळू गाडी मुक्कामाचे अंतर कमी होत होते.कुठेतरी दूरवर एखादी लाईट चमकताना दिसत होती.
   सुमारे पाऊण तासाने एक गाव आल्यावर  प्रशांतची गाडी थांबली.ंसगळे खाली उतरलो. पंडित सरांनी गावाचे नांव सांगितले,हे आमचे मूळ गाव मोसे बुद्रक.वाडी वस्तीचे गाव होते.वरसगांव धरण मुठा नदीच्या उपनदीवर मोसे उपनदीवर आहे.
धरणामुळे आमच्या गावाचे पुनर्वसन दौंड भागात झाले आहे. पानशेत धरण या धरणाच्या पलीकडे आंबी नदीवर आहे.
     अजूनही आमचं ठिकाण दहा एक किमीवर होते.वरसगांव धरणाच्या जलाशयाला हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती शूरवीर बाजी पासलकर यांचे नाव दिले आहे.आमचा रात्रीचा प्रवास शिवकालीन बारामावळ खोऱ्यातील मोसे खोऱ्यात होत होता.८४ खेड्यांचे राजे सरसेनापती बाजी पासलकर होते.त्यांचे मुसे हे गांव  धरणाच्या रस्त्यालाच मोसेबुद्रुकच्या पुढं आहे.रात्रीच्या प्रवासात त्यांच्या गावाचे दर्शन झाले.अशा शूरवीरास मानाचा मुजरा आणि त्रिवार वंदन केले.अशा ऐतिहासिक भूमीत आल्याचे समाधान वाटले.वेल्हा तालुक्याचा रस्ता संपल्यावर मुळशी तालुक्याची हद्द सुरू झाली.आता रस्ता बऱ्यापैकी होता.कॉटेज, रिसॉर्ट आणि हॉटेल अंतरा अंतरावर दृष्टीस पडू लागले.पण लेक व्ह्यू कॉटेज दासवे बोर्ड कधी दिसतोय असं झालं होतं.पण थोड्याच अंतरावर उजवीकडे एमटीडीसी मानांकित लेक व्ह्यू कॉटेज बोर्ड दिसल्यावर हायसे वाटले.लगेच स्वागतकक्षात जाऊन नोंदणी केली.मग आमचे टेंपरेचर तपासून रुमपर्यत वेटर आम्हाला घेऊन गेले.मस्तपैकी फ्रेश होऊन निवांतपणे लॉनवर बसलो…
क्रमशः भाग क्रमांक-३
माझी भटकंती भाग क्रमांक-१४४ 
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड