छंदवेड्या मित्रांसमवेत मुशाफरी भाग क्रमांक-१३८
🍂🍃☘️🍁🍂☘️🌿🍂🍁छंदवेड्या मित्रांसमवेत मुशाफरी.....
दिनांक १० नोव्हेंबर २०२०
🍁ग्रेटभेट ❗लेखक, कवी, संग्राहक आणि निसर्गाची. क्रमशः भाग -३
माझी भटकंती भाग क्रमांक-१३८
〰️〰️〰️〰️〰️〰️
श्री राजेन्द्र गुरव सर छांदिष्ट्य समुहातील एक अवलिया प्रसन्न आणि हसरे व्यक्तिमत्व .त्यांनी दिल खुलासपणे आमचे स्वागत केले.
सर्वांची ओळख आयोजक केंद्रप्रमुख श्री दीपक चिकणे सरांनी करुन दिली.परिचितांशी गळाभेट आणि नुकतीच ओळख झालेल्या मित्रांशी हस्तांदोलन करत ,आस्थेने संवाद साधायला सुरुवात केली.मग त्यांच्याच मागोमाग औंध निवासिनी यमाईदेवीच्या डोंगरावरील देवीच्या मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांच्या वाटेकडे गेलो.दगडी तोडीची बांधिव पायऱ्यांची पायवाट होती.
दुतर्फा सिताफळ व इतर वृक्षांची दाट सावलीतली वाट होती.
तनमनाला शीतल गारवा देणारी वाट.आम्ही त्यावरच बैठक मारली.मग गुरव सरांनी पिशवीतून थर्मास आणि बिस्कीट पुडे काढले.
आमचं आदरातिथ्य करायला घरुनच चहा बनवून आणला होता.प्लॅस्टिक कपात चहा भरुन सर्वांना दिला.
बिस्कीटे घेण्याचाही आग्रह करत होते.तेवढ्यात श्री संतोष शिंदे सरांच्या लक्षात आले की घरुन आणलेल्या डब्यात ओव्हनमध्ये बेक केलेली बिस्किटे आणि शंकरपाळी आणली.सत्वर आणायला थोड्या अंतरावर पार्क केलेल्या गाडीजवळ गेले.पटकन स्टील डबा घेऊन आले. सगळ्यांना बिस्किटे आणि शंकरपाळी घेण्यासाठी आग्रह करुन लागले.प्रत्येक जण मग चहा सोबत शंकरपाळीआणि बिस्किटांचा आस्वाद घेत चहापानात रंगले. श्री राजेन्द्र गुरव सरांच्या हातात शंकरपाळी होती.अचानक त्यांनी त्यावरील कडा म्हणजे काय? या प्रश्नाने धर्म आणि पंथ याविषयीची तात्त्विक माहिती प्रस्तुत करायला सुरुवात केली. सहज सुंदर सोप्या अमोघ वाणीत सरांनी गोष्टी द्वारे शंकराच्या पिंडी व दिशा याचे महत्त्वही कथन केले.आज चहा सोबत छान पैकी नव्याने माहिती समजू लागली.यावरुनच सरांच्या धार्मिक अभ्यासाची उकल लक्षात आली.शब्दांचे सामर्थ्य समजले.
आहेत.त्यांच्या वाक् चातुर्याचा अनुभव वाचन लेखनाचा व्यासंगावरुन लक्षात आला.
'सरांची पुस्तके आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.' ही प्रसिद्धी चिकणे सरांनी सांगितली.औंध म्हणजे यमाईमंदिर,पंतप्रतिनिधी संस्थान आणि साने गुरुजींचे अल्पकाळ शिक्षणासाठी व्यास्तव्य एवढीच माहिती असणारे आम्ही.पण सरांनी आपल्या रसाळ शांत वाणीतून औंधचा सांस्कृतिक, शैक्षणिक,
सामाजिक, भूगोल आणि इतिहास प्रस्तुत करायला सुरुवात केली.
औंधची प्राचीन काळातील निर्मिती,
यमाईमंदिराची स्थापना ,औंध संगीत महोत्सव,संग्रहालय,मान्यवर साहित्यिकांच्या भेटी आणि महात्मा गांधीचा माण देशातील लोकशाहीचा प्रयोग इत्यादी वैशिष्ट्ये पूर्ण नगरीच्या संस्कृतीची महती अल्प वेळात नेटक्या शब्दात कथन केली.चिकणे सरांनी शिवानंद स्वामी आणि महाबळेश्वरचं नातं याची माहिती दिली.एवढेच नव्हे तर तुम्ही बसलेल्या या बांधिव पायऱ्या कैद्यांच्या मदतीने बांधलेल्या आहेत.असं गुरव सरांनी सांगितले.
मंदिराच्या पायथ्याशी पायऱ्यांवर बसून औंधच्या संस्कृतीचे दर्शन रसाळ वाणीतून झाले.पुढे जाण्याची घाई असल्याने आवरते घेत सरांचा निरोप घेताना,छांदिष्ट्य समूहातील अवलियाची प्रवासाच्या वाटेत भेट घडली.ती चिरकाल टिकावी ,
स्मरणात रहावी म्हणून आमचे मार्गदर्शक श्री दीपक चिकणे सरांनी स्वत: तयार केलेले कॉफीचे रोपटे 'मैत्रवृक्ष' म्हणून माझ्या हस्ते अवलिया श्री राजेन्द्र गुरव सरांना भेट द्यायला लावले.त्यासोबत महाबळेश्वर मधील निसर्गरम्य परिसरात अध्ययन अनुभव देणाऱ्या गुरुजींच्या छंदातूनबनलेला"परिमळ"
काव्यसंग्रह आणि सर्व कलांचा अधिपती गणपती बाप्पाची मुर्ती 'आठवण भेट' म्हणून दिली.हा प्रसंग उध्दव सरांनी त्वरीत मोबाईलमध्ये टिपला.सर्वांचे आभार मानताना गुरव सर उध्दवला म्हणाले,तुझा पहिला फोन आला होता तेव्हा मी समोर दूरवर दिसणाऱ्या डोंगराच्या पायथ्याला शेतात होतो.
इतक्या लांबून छांदिष्ट्य समूहातील छंद वेड्या मित्रांना भेटायला आले.साध्विकता आणि औदार्याचे प्रसन्न व्यक्तिमत्व आमच्यासाठी यमाई देवीच्या पायथ्याला पाहूणचारासाठी तत्पर आले.
अकल्पितपणे सरांची वक्तृत्वाची झलक ऐकायला मिळाली.औंध संस्थानच्या माहितीची आणखी भर पडली.त्यांचा निरोप घेऊन आम्ही वाटेतल्या अनोळखी व्यक्तींना आपुलकीने हाक मारत बरोबर निघालोय का ? याची खात्री करत खरसुंडीकडे मार्गस्थझालो....
क्रमशः भाग -३
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
माझी भटकंती भाग क्रमांक...१३८
Comments
Post a Comment