दिवाकराचं मावळणं काव्य पुष्प-१९०




दिवाकराचं मावळणं 

कॅनव्हासवर सूर्यास्त रेखाटला 
 विलोभनीय दृश्य तिन्हीसांजेला
भगव्या रंगाची छटा आभाळाला 
ऊर्जा देवून पल्याड निघाला |

काळ्या धूसर छटेत 
बिंब खुलूनी सजते 
झाडाच्या तोरणा सवे 
बिंब नजरेत भरते |

थंडगार वारं अंगावर घेत 
सूर्यास्ताचं  दृश्य न्याहाळत 
प्रवासाचा वेग मंदावतो 
रमणीय दृश्याला टिपतो |

सूर्यास्ताचे दृश्य सागर किनाऱ्याचे 
सांजचे दृश्य डोंगराआडचे 
सायंकाळचे दृश्य क्षितीजावरचे 
उल्हासित करणाऱ्या मावळतीचे|

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-१९०
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड