घाटावरची सांजवेळ काव्य पुष्प-१९४



        घाटावरची सांजवेळ
नदीच्या घाटावर रम्य सांजवेळ 
जलावर उमटली तरंगाची सळसळ 
मंद प्रकाशाने मंतरलेली कातरवेळ 
झाडांची गर्दछाया पानांची सळसळ|

निवांतपणाने विषय चघळतात
काहींचे गप्पांचे फड रंगतात
काहींची पावले फेरफटका मारतात 
छोट्यांचे मजेशीर खेळ रंगतात|

पाखरांचं स्वच्छंद विहारणं 
पक्षी कोलाहल करतात 
आभाळातील तेजाची किरणं 
हळूहळू धूसर होतात |

मग तिन्हीसांजेच्या गप्पा 
दिवसाचा आढावा घेतात
काळोखाच्या आगमनापूर्वी
पक्षी घरट्याकडे परततात |

माजलेलं विचारांचे काहूर 
क्षणभरासाठी शांत होते 
हलणारी पानं थबकतात  
वाऱ्याची झुळूक मंदावते |

कडूस पडलंकी बल्ब पेटतात 
जलात दिसते प्रकाशाची रोषणाई  
पावले घराकडे ओढू लागतात
चालताना ऐकू येते शयनाई|
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-१९४
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई 
काव्य पुष्प-१९४

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड