चौकट काव्य पुष्प-१९३
चौकट
वेधक टिपलेली छबी
छायाचित्रात बध्द होते
टेबल अथवा भिंतीवरील
दर्शनी भागात झळकते|
चौकट असते नात्याची
विश्वासाच्या रेघांची
नात्यांच्या कोनाची
एकत्र नांदण्याची |
मनपसंत देखाव्याची
निसर्ग सौंदर्याची
ऐतिहासिक ठेव्याची
पुरातन वास्तू वस्तूंची |
विशेष पोजमधला फोटो
सुंदर मनमोहक वाटतो
दिवाणखान्यातील दर्शनी भागात
भिंतीवर तसबरीत झळकतो|
आयत, चौकोनी आकार धारणं
चित्रांचे बाह्यांगी नजारा खुलवणं
चौकटीत असतं साचेबंद जगणं
आयुष्याची चौकट उठावदार करणं|
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-१९३
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https:// raviprema.blogspot.com
Comments
Post a Comment