ट्वेन्टी ट्वेन्टी २०२०📖वेचक वेधक काव्य पुष्प-१८८
🍁ट्वेन्टी ट्वेन्टी २०२०📖
वेचक वेधक
कोवीड १९ची आफत आली
सगळीकडे लॉकडाउन झालं
बाहेर फिरायला बंदी घातली
वर्क फ्रॉम होम सुरू झालं||
हात प्रक्षालन सॅनिटायझरने करा
बाहेर पडताना मास्क वापरा
शारिरीक अंतर राखून संवाद करा
शेकहॅण्ड पेक्षा राम राम बरा||
सहभागातून माजी विद्यार्थ्यांनी
शाळेचे बाह्यांग पालटले
जननी चॅरिटेबल ट्रस्टने
स्कूल कीट प्रदान केले||
साठवणीतल्या आठवणी जाग्या झाल्या
फेसबुकच्या मदतीने लेखन केले
भटकंती लेखनाला वेळेचा सदुपयोग झाला
चित्रांचे भाव काव्यात रचले||
मंगलकार्य ठरलं गणपती उत्सवात
लगीन लागलं शेवटच्या आठवड्यात
सामाजिक संस्थांना करुनी मदत
नवदांपत्याचे झालं अनोखे स्वागत||
गप्पागोष्टीत मनं मोकळी झाली
नात्यांची वीण घट्ट झाली
नवनवीन मेनू खायला मिळाले
घरगुती केक तयार होऊ लागले ||
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-१८८
Comments
Post a Comment