माझी फसगत भाग क्रमांक-१३३
🌿💫☘️💫🌿💫🌿💫🌿
माझी फसगत
क्रमशः भाग क्रमांक-१३३
एकदा पंधरा दिवसांनंतर शनिवारी कॉलेज सुटल्यानंतर भांडुप(पुर्व)टिळकनगरला काकांकडे निघालो.त्यांनी सांगितलेल्या प्रमाणे घाटकोपरच्या उतरलेल्या बसथांब्यावर आलो.तिथं भांडुपला जाणाऱ्या बसची चौकशी केली असता.आगे के बसस्टॉप पर जाओ| व्हा बस मिलेगी| दोन-तीन वेळी पुढं पुढं चौकशी केली.योग्य बसस्टॉप मिळाला नाही.त्यामुळे भांबावून गेलो.गोंधळून तसाच उलट दिशेला गेलो.आणि पुढच्या बसस्टॉपवर चौकशी केली तर तो इसम म्हणाला ,'तुम्हाला कुठं जायचंय.'मी म्हणालो,'भांडूपला' त्यावर त्याने असाच पुढं जाऊन ब्रीज क्रॉसिंग करुन पुढे जा.तिथं बसस्टॉप आहे.मग त्याप्रमाणे घाईघाईने निघालो.बसस्टॉपवर बसची वाट पाहत एकतास गेला तरी तिथं बसकाही थांबेना..त्यामुळे कंटाळा आला.तिथचं एका माणसाला मला भांडुपला टिळकनगरला जायच आहे.कुठं बस मिळेल.त्यावर त्याने, 'लोकल ट्रेनसे जाओ .'अस सांगितले.मला तर आता काही समजेना.माझी त्रेधातिरपीट उडाली.गोंधळून गेलो.ट्रेनने कसे जायचे याची खात्रीशीर माहिती नव्हती.आपण नेमका रस्ता चुकलोय .मग तिथल्याच एका जाणाऱ्या रिक्षावाल्याला थांबविले.त्याला विचारले मला भांडुपला जायचयं.बसडेपो कुठं आहे.तिथं रिक्षा घ्यायला सांगितली.तो मराठी होता.मग सगळी घटना त्याला सांगितली.तो म्हणाला तुम्ही चुकीच्या बसस्टॉपवर उभे होता.इथं बसक्रमांक आणि ठिकाणानुसार बसस्टॉप असतात. पंतनगरच्या बस डेपोत गेल्याव चौकशी करा.म्हणजे बस मिळेल. काहीवेळाने बस डेपोत पोहोचल्यावर रिक्षाचे पैसे दिले.त्याचे आभार मानले. आणि वाहतूक नियंत्रक यांना,' मला भांडुपला एसपीएस मार्गावरील सर्वोदयनगरला जायचं आहे.जिथं बाहेरच्या एस.टी.थांबतात तिथं जायचं आहे.प्लीज बसचा नंबर सांगा. आली की नक्की सांगा.' असं एका दमात बोललो.तो म्हणाला,'पहिल्यांदा आलाय काय मुंबईला, ओके सांगतो बस आली की..पाचच मिनिटात बस आली की त्याने या बसने जाण्याची सूचना केली. कंडक्टरला कुठं सोडायचं हेही सांगितले.प्रचंड ट्रॅफिक , वाहनांची वर्दळ आणि बसमधील गर्दी बघत बघत प्रवास चालला होता.उकाड्याने घालमेल होत होती.दीड-दोन तासांनी त्याने मला तुमचा स्टॉप आलाय . गाडी थांबवली मीही खाली उतरलो.बस निघून गेली.मी कावरा बावरा झालो कारण हा वेगळाच रस्ता दिसत होता.जवळच तलाव होता.अगोदर गेलो तो हा स्टॉप नव्हता.आपण खरच रस्ता चुकलोय,आपली फसगत झालीय.म्हणून पाहुण्यांना फोन करायला टेलिफोन बूथ मध्ये जाताना वाटेतल्या एका माणसाला ,'अभ्यूदय बॅंकेची शाखा इथं कुठे आहे हे विचारले.'त्याने ,'आप यहासे आगे जाके राईटके रस्तेसे सिधे जाओ.थोडेही अंतरपे बॅंक मिलेगी.' त्याप्रमाणे घाईघाईत निघालो.फोन करायचा विसारलो.
मिनिटात बॅंक दिसल्यावर जीवातजीव आला.जरा हायसं वाटलं. बिगीबिगी बॅंकेच्या समोरील अरुंद वाटेवरून पाहुण्यांच्या खोलीवर गेलो. आत पाय टाकताच, 'पहिलं पाणी द्या प्यायला', असं म्हणालो.
आणि घडलेली हकीकत सांगताच ते सगळे हसायला लागले. आणि मला रडू कोसळले. आपण शहरातल्या कितीतरी गोष्टींपासूनअनभिज्ञ आहोत. याचा खेद वाटला.चहा पिल्यानंतर पाहुण्यांच्या कन्येने (मनिषा) ट्रेनने येण्याजाण्याचा सल्ला दिला.आणि एल ११८ या बसने ये-जा कर.ही बस फक्त लिमिटेड ठिकाणीच थांबते.तीचा बसस्टॉप विद्याविहारच्या चेंबूर बाजूकडील गेटजवळ व समोरच आहे.तदनंतर मी ज्या ज्या वेळी भांडुपला गेलो.तेंव्हा त्याच बसने जायचो यायचो...तेथील दहिहंडी उत्सव आणि नववर्षाचे स्वागत हे कार्यक्रम आजही आठवतात..
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
क्रमशः भाग क्रमांक-१३३
चांगले लेखन
ReplyDelete