बालभारती काव्य पुष्प-१९१





वर्धापनदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा ❗
 *****बालभारती
धुळाक्षरांच्या पाटीवर अक्षरे गिरवली
बोबड्या बोलीतचित्रं वाचली 
चित्रं वाचत अक्षरे उमगली 
शब्दांची जुळवाजुळव झाली|

 लेखनाची अभिरुची वाढवली
धडे कविता पाठ झाली
वाचनाची आवड वाढवली 
ज्ञान माहिती मिळत गेली|

नव्या कोऱ्या पुस्तकाचा दरवळे गंध
 विचारांचा लाभला संस्कार सुगंध
पुस्तकासवे लाभला मैत्रीचा बंध
वाचन खजिन्याचा दरवळला गंध |

बहीण भावाचे चित्र मनात घर करते 
गणन,रसास्वाद ,परिसर फिरवून आणते 
विज्ञान-तंत्रज्ञानाचे कुतूहल वाढविते 
कथा कविता नाट्यछटा सादर करविते |

बालभारतीचे पुस्तक बघितल्यावर
बालपणीच्या आठवणी स्मरतात
व्यक्त होण्याची संधी मिळाल्यावर 
बाई अन् गुरुजी डोळ्यासमोर येतात |

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-१९१

Comments

  1. खुपच सुंदर अशी रचना सर.
    ' बालभारती ' वर छान रचना लिहिलय.बालमनाच प्रतिबिंब रचनेतून पडलेल आहे.लहान मंडळीना आणि थोरामोठ्यांनाही आवडणारं बालभारती अनेकांच्या आठवणीत कायम राहणार आहे.
    सुंदर कविता सर.
    बालभारतीशी जुळलेल नातं हे आयुष्यभर आपली सोबत करणार आहेत.

    राजू गरमडे, चंद्रपूर

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड