शाळा माझी ओझर्डे काव्य पुष्प-१८९
शाळा माझी जिल्हा परिषदेची
व्यक्तिमत्व विकासाची शिदोरी
शिकलेल्या शाळेत शिक्षक झालो
अभिमान वाटतोय मनगाभारी||
दोस्तांच्या संगतीच्या जमाडी गमती
बालसभा सहली कवायत भारी
सांघिक मनोरंजन खेळांच्या संगती
आनंदाचं उधाण वाहिलं खरोखरी ||
बाई गुरुजींचं संस्कारक्षम धडे आठवले
घटना प्रसंग मालिकेत मन रेंगाळले
याच शाळेत पहिले भाषण झाले
दोन रुपयांचे बक्षीस आठवले ||
ज्ञानमंदिराला अल्पमदत देवूनी
कृतज्ञतेने नतमस्तक झालो
ऋणानुबंदाची ठेवून जाणीव
स्नेहसन्मानाने भारुन गेलो ||
शब्दांना माझ्या विस्तारणे
शाळेचे हे ऋण नविसरणे
गुणवत्तेला मदत करणे
पणती होवून प्रकाशने||
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-१८९
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https:// raviprema.blogspot.com
मस्तच आपल्या शाळेची कविता
ReplyDelete