आनंदाचे हास्य कविता ८७




        आनंदाचे हास्य 

पारंपरिक फुगडीच्या खेळानं      
आनंदाच्या उकळ्या फुटल्या
 रंगात आलेल्या फुगडीनं 
नव्या हास्यसाजात नटल्या|

बाईंच्या फुगडीचे चकार वाढले 
मुलामुलींचे कुतूहल प्रगटले  
निरागस आनंद चेहऱ्यावर झळकले 
मुलांच्या ओठी हास्य उमटले |

झिम्मा फुगडी आनंदाचे खेळ
लय अन् ठेक्याचा जमतोय मेळ 
लोकगीतांचा सजतोय मेळा
श्रावण मासात उत्साहाने खेळा |

बाईंच्या फुगडीने नजर वेधती 
मुले-मुली हास्याने दाद देती 
मुलींच्या मनात विचार दाटती 
बाई माझ्या संग कधी खेळती |

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प ८६ 
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी
https://raviprema.blogspot.com
फोटो साभार गुगल प्रतिकात्मक चित्र



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड