जीवनवाहिनी कृष्णामाई कविता १०१



⛈️जीवनवाहिनी कृष्णामाई🌧️

चार दिवस संततधार पावसाने 
मुसळधार फलंदाजी केली 
धरण क्षेत्रात पाणीच पाणी करून
जलाशयाने सीमारेषा गाठली  ||

श्रावणातल्या सरी कोसळल्या
ओढे नाले नद्या प्रवाहित झाल्या 
पाझर तलाव बंधारे ओसंडले 
जनजीवन विस्कळित झाले||

धोम धरणातल्या विसर्गाने 
पपूर आलाय कृष्णातिरी 
अवखळ झाली कृष्णामाई 
पाऊस पडतोय सरीवर सरी ||

अचूक वेळी पडल्याने 
पीकांना बहार आली 
जमीनीत पातळी वाढली
जलाची साठवण झाली||

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प १०१
रचना दिनांक १७आॅगस्ट २०२०
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com

Comments