बहार कारवीचा कविता ९४



बहार कारवीचा 

पांढर कळ्यातून 
फुलदाणी फुलली
निळसर फुलांची 
सजावट झळकली |

डोंगर कड्यात 
उतारत्या रानात 
कारवीच्या बनात
हिरव्यागार पानात |

निळ्याधवल पुष्पमाला 
दिसे लायटिच्या माळा
फुलांनी तोरण बांधले 
वसुधेचे स्वागत केले |

निळसर पुष्पांचा
बहारदार नजारा 
संगतीला धवल 
कळ्यांचा  गजरा|

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प ९४
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी
https:// raviprema.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड