जिद्द बालमनाची कविता ९२
जिद्द बालमनाची
ध्यास माझा शिकण्याचा
सुसंस्कारित होण्याचा
व्यक्तिमत्त्व विकासाचा
चांगला माणूस बनण्याचा
खडतर प्रवासात
अनेक खाचखळगे
ओलांडीन मी
संघर्षाचे जिणे
आभासी जगात
वास्तव जगण्याचा
माझ्या स्वप्नांना
साकार करण्याचा
उंच भरारी
मी घेईन
कार्य कर्तृत्व
सिद्ध करीन
मनाची उलघाल
इतरांना न ठावे
बालमनातले वेध
मी का सांगावे?
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प ९२
फोटो साभार श्री रमेश जावीर सर
Comments
Post a Comment