सप्तश्रृंगी माता डोंगर कडा कविता ९५
सप्तश्रृंगी माता, डोंगर कडा
डोंगरकड्यात मातेचे मंदिर
पायऱ्यांची चढण वाट
नामस्मरण करत जायूया
राउळाचा पाहूया थाट ||
थंडगार वाऱ्याच्या झुळूकीने
गारवा मिळतो जीवाला
सप्तश्रृंगी मातेच्या दर्शनाने
समाधान लाभतं मनाला ||
राकट कणखर कातळ पहाड
माथ्यावरी शोभतेय चंद्रकोर
भटकंतीचा मार्ग खडतर
धाडसाने फिरायला पायजे जिगर ||
उन्हाळ्याच्या दिसात तहानतो जीव
तिखटमीठाच्या काकडीची घेवूया चव
उन्हाच्या झळ्याने अंग घामजले
उन्हाच्या चटक्याने डोके तापले||
सुंदर दृश्य नजरेस पडते
डोंगरकड्याचे स्वरुप कळते
वाऱ्याच्या वेगाची जाणीव होते
मातेच्या दर्शनासाठी गर्दी दाटते||
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प ९५
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com
Comments
Post a Comment