बालमनातला पाऊस कविता ८२
🌧️⛈️🌧️⛈️🌧️⛈️🌧️
बालमनातला पाऊस
अल्लड पावसात चिंब भिजले
सरींचा गारवा मनाचे झुले
अंग शहारून रोमहर्षक झाले
आनंदाने नाचू बागडू लागले
भिजण्याचा आनंद लुटती
सरीवर सर टपटप नाचती
तनमनाची पाखरं बागडती
मजा,मौजमस्ती आस्वादती
हर्षोल्हास पोरसवदा वयात
आनंद मावेनासा गगनात
पावसाची रिमझिम बरसात
गतकाळाची सय होते मनात
लहानपणीचा सुखद आनंद
काळजाच्या कुपीत रहातो
पावसाच्या शिडकाव्याने
अत्तराचा सुगंध दरवळतो
⛈️🌧️⛈️🌧️⛈️🌧️⛈️
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प ८२
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी htpps://raviprema.blogspot.com
फोटो साभार श्री रमेश जावीर सर
Comments
Post a Comment