आवडती गाणी कविता ८०





🎼आवडती गाणी 🎼

मधूर सुर कानी येते
धूनांची सूरावट  गुंजते
 ह्रृदयात मन गुंतते
थकवा कंटाळा दूरते||

मोहरुन मन झाले बावरे 
मंत्रमुग्धतेने देहभान हरपले
गाणं दिलखुलास रंगते
वाद्यांच्या तालाने फुलले||

गाणं भावना खुलविते 
मनीचा पिसारा फुलवते 
‌क्षणात माहोल बदलते 
मन मोहरुन  दाद देते||

श्रवणाचा आनंदानुभव
आनंदाचे क्षण करतो 
आवडीच्या तालावर 
भान हरपूनी नाचतो ||

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प ८०
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी https://raviprema.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड