खेळ रंगला कविता १०२
खेळ रंगला
टेकडीच्या पायथ्याशी
क्रिकेटचा खेळ रंगलाय
बसलेल्या मुलांच्या मनात
ताळमेळ रणविकेटचा चाललाय ||
बॅटबॉल सगळ्यांच्या आवडीचा
उन्हातान्हात खेळण्याचा
टीमला चेर्अप करण्याचा
मस्ती , मजा अन् चिडाचिडीचा ||
मोकळ्या पटांगणात
खेळ रंगतो नवा नवा
खेळण्या पेक्षा खेळाचा
निर्मळ आनंद हवा हवा ||
तहानभूक विसरतात
मुलं खेळात रमतात
एकमेकाला शिकवतात
निकोप स्पर्धा करतात||
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प १०२
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com
Comments
Post a Comment