बाल आनंद मेळावा कविता ८६
बाल आनंद मेळावा
🥰🍭🍬🍫🥳
बालकांच्या कलेचा मेळा
सगळ्यापरी आहे निराळा
मनी त्यांच्या मोद हर्ष रुजावा
हाच खरा आनंदाचा सोहळा ||
वेगवेगळ्या पदार्थांची दुकानदारी
खाऊसाठी गर्दी खवय्यांची सारी
मनोरंजक खेळांची मेजवानी
धमाल मजेची आनंदगाणी||
आनंदाला आले उधाण
टीम जमली फारच छान
नृत्य बसवलं चित्रफित पाहून
सरावाची तालीम नाच करुन ||
मुलांना संधी मिळाली
कला सादर करण्याची
बहारदार अदा दिलखेचक
लयबद्ध नाच मनमोहक||
नवरी नटली सुपारी फुटली
या गाण्याव पावलं थिरकली
भंडारा उधळला आकाशी
अन् लगीन लागलं बानूशी ||
नृत्याने ठेका धरायला लावला
टाळ्यांचा गजर वाजायला लागला
रसिकांनी उत्स्फूर्त कडकडाट केला
वन्स मोअरचा ठेका सुरू झाला||
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प ८६
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी
https://raviprema.blogspot.com
Comments
Post a Comment