विहीरीचे सौंदर्य कविता ८९
🔆विहीरीचे सौंदर्य🔆
कलाकुसरीचे संगमरवरी चिरे
नक्षीदार जाळीदार खांब बहरे
पाच इमली आखीवरेखीव सदरे
कोरीव कामाचे सौंदर्य न्यारे ||
रेखीव पायऱ्या नक्षीदार
विहीरीतलं जल थंडगार
अद्भुत कलेचा आविष्कार
नजरेत भरले कलेचे द्वार ||
लौकिक जागतिक वारसा स्थळाचा
बहारदार नजारा राणी विहीरीचा
उत्तम नमुना वास्तूकलेचा
ऐतिहासिक ऐश्र्वर्य संपन्नतेचा||
वास्तू बघताना देहभान हरपले
कुतूहलाने न्याहाळले नक्षीचे इमले
नयनरम्य दृश्ये कॅमेऱ्याने टिपले
वास्तूशैलीचे कवतिक केले||
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प ८९
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी
https://raviprema.blogspot.com
Comments
Post a Comment